Home जळगाव मुहम्मद पैगंबर साहेबांनी मानव समाजाला काय दिले….इस्लामी पुस्तके व कुराण वितरित…!

मुहम्मद पैगंबर साहेबांनी मानव समाजाला काय दिले….इस्लामी पुस्तके व कुराण वितरित…!

108
0

रावेर (शरीफ शेख) 

शुक्रवार ३० ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगामध्ये इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद(स व स) यांचे जन्म दिवस साजरा करण्यात आला.
हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांचे नाव उच्चारताना मुस्लिम बांधव आदर भावाने त्यांच्या नावाबरोबर सल्लल्लाहु आले ही वसल्लम असे उच्चारतात म्हणजे त्यांच्यावर अल्लाहची सदैव कृपा आणि शांती असो पैगंबर साहेबांचा जन्म मक्का येथे हे सोमवार दिनांक १२ रबी उल अवल इसवी सन 571 मध्ये झाला व त्यांचे देहावसन सोमवार दिनांक १२ रबीउल ११ व इसवी सन ६३३च्या मे महिन्यात झाले आहे।

इस्लामचे प्रेषित हजरत मुहंमद पैगंबर(स व स )हे केवळ मुसलमानांचेच नसून ते समस्त विश्वाला प्रदान करण्यात आलेले साक्षात करुणासागर आहेत.
पवित्र कुराण मध्ये आहे
” हे पैगंबर। आम्ही तुम्हाला समस्त सृष्टीसाठी करुणा म्हणून पाठविले आहे”
म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की या महान प्रेषितांचा संदेश केवळ मुसलमान साठीच नव्हेतर संपूर्ण मानवजातीसाठी आहे.
हजरत मोहम्मद पैगंबर यांची अंतिम घटका जवळ आली तेव्हा त्यांनी लोकांना उद्देशून प्रतिपादन केले पहा मी दोन गोष्टी तुमच्या सुपूर्द करून जातो आहे तोवर तुम्ही त्यांना घट्ट धरून ठेवाल तोवर तुम्ही सन्मार्गावरून भटकणार नाही, त्या दोन गोष्टी आहेत *कुराण आणि मी जे सांगितले आणि केले ते म्हणजे हदीस.”* कुरआना बाबत सांगावयाचे तर साक्षात चमत्कार आहे मानव जाती मध्ये येऊन त्यास चौदाशे पन्नास वर्षे लोटली आहेत.
कुराण पवित्र ग्रंथ आहे जो प्रेषित साहेबांवर अल्लाच्या अत्यंत विश्वसनीय देशदूत यांच्यामार्फत अवतरीत करण्यात आला आतापर्यंत लाखो नव्हे तर कोट्यावधी व अब्जावधी लोकांनी त्याचे वाचन ,पठण केले आहे किमान त्याला स्पर्श तरी केला आहे या पवित्र ग्रंथाच्या वाचतात आबालवृद्धांचा समावेश आहे याचे वैशिष्ट्य असे की कोठल्याही आवृत्तीत आजतागायत एका अक्षराचा ही फेरफार व फरक पडणार नाही
हजरत मोहम्मद पैगंबर यांनी स्वतः मुखोद्गत करून सर्वप्रथम आणि सरतेशेवटी सादर केले होते ते जसेच्या तसेच आढळते.
जगातील सर्वाधिक छापला व वाचला जाणारा हा महान ग्रंथ आहे.
हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय प्रशासन व पोलीस सेवेतील कार्यरत माननीय डॉक्टर अभिजीत राऊत जिल्हाधिकारी जळगाव व माननीय डॉक्टर प्रवीण मुंडे पोलीस अधीक्षक जळगाव यांना जळगाव कोविड केअर युनिट चे अध्यक्ष गफ्फार मलिक, मुख्य आश्रयदाते मुफ्ती आतिकुर रहेमान, जनसंपर्क प्रमुख फारुक शेख ,समन्वयक डॉक्टर जावेद शेख, वहीदत ए इस्लामी चे अतीक शेख,जामा मस्जिद ट्रस्ट चे तय्यब शेख, इदगाह ट्रस्ट चे अनिस शहा यांच्या हस्ते मोहम्मद पैगंबर साहेबांनी मानव समाजाला काय दिले ही अनिश चिस्ती लेखकाने लिहिलेली पुस्तिका व पवित्र कुराण याच्या प्रती देण्यात आल्या तसेच जळगाव शहरात व जिल्ह्यातील सन्माननीय व अभ्यासू अशा लोकांना सुद्धा या प्रती देण्यात आल्या असून ज्या कोणाला याबाबत पुस्तिका पाहिजे असल्यास त्यांनी फारुक शेख ९४२३१८५७८६ वर संपर्क साधावा संबंधितांना त्यांच्या घरी हे साहित्य पुरवण्यात येईल असे आव्हान करण्यात आलेले आहे.