Home जळगाव जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशन यांच्या कडून जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन

जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशन यांच्या कडून जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन

95
0

 

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशन यांच्या कडून
जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन
ट्रक चालकांना मारहाण करून पैसे लुटणारे टोळीला जेरबंद करणे तसेच
वाहतुक पोलीसांकडून ट्रकचालकांना होत असलेला त्रास कमी करण्यासाठी दिले निवेदन –
जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनकडून जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,जळगांव शहराच्या नशिराबाद हद्दीपासुन ते बांभोरी पर्यंत मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक चालकांना अडवुन, हुज्जत घालुन, मारहाण करून पैसे हिसकवणारी टोळी कार्यरत आहे. दि.२६/१०/२०२० रोजी गुजराल पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री अशी घटना घडली आहे.
या पुर्वी अशा घटना दररोज घडत आहे. अनेक ट्रक चालक परराज्यातील असतात ते ट्रक
चालक पोलीसांचे शुक्लकाष्ट मागे लागु नये म्हणून तक्रार करीत नाही. काही स्थानिक
ट्रकचालक तक्रार करायला पुढे येतात मात्र स्थानिक पोलीस कोणत्याही प्रकारचे
सहकार्य न करता ट्रकचालकांना दमदाटी करतात व त्यांच्यावरच खोटेनाटे आरोप लावतात.
तरी सदर रस्त्यावर रात्रीचे पेट्रोलिंग वाहन सुरू करावे. तसेच नशिराबाद, एमआयडीसी, जिल्हापेठ व तालुका पोलीस स्टेशनला याबाबत सुचना द्याव्यात अशी विनंती.करण्यात आली,
दरम्यान शहरातील वाहतुक पोलीस पण ट्रकचालकांना विनाकारण थांबवुन त्रास
देतात याबाबत ही लक्ष पोलीस अधिक्षकांनी लक्ष देण्याची मांगनी निवेदनात केली आहे. निवेदनात
सैय्यद शाहीद सैय्यद शब्बीर सैय्यद अशफाक सैय्यद निसार हसीन रशिद खान बेगवाला
शरद शांताराम चव्हाण
संजय भगवान वाघ, कल्पेश छाजेड,वसीम अहेमद व सर्व पदाधिकारी जळगांव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशन,जळगांव.
यांनी पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले त्यावर पोलीस अधिक्षकांनी योग्य ते कार्रवाई करण्याचे आश्वासन दिले.