Home उत्तर महाराष्ट्र भावाच्या छळाला कंटाळून बहिणीची आत्महत्या…

भावाच्या छळाला कंटाळून बहिणीची आत्महत्या…

869

भावाच्या छळाला कंटाळून बहिणीची आत्महत्या…

 

 

आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

 

बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील एका 17 वर्षाच्या मुलीने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. चुलत चुलत भाव असणाऱ्या विशाल पोमणे याने वारंवार दिलेल्या त्रासाला कंटाळून आज या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी विशाल युवराज पोमणे यास पोलिसांनी अटक केली आहे.

या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी माहिती दिली. आरोपी हा पिडीत मुलीस वेळोवेळी घरी येऊन मोबाईल वरून फोन करून, मेसेज करून त्रास देत होता. आज ही त्याने खूप त्रास दिल्याने त्रास असह्य झाल्यानें संबंधित मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पिडीत मुलगी ही आरोपीची नात्याने चुलत चुलत बहीण लागतं आहे. त्यामुळे या घटनेने बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासला गेल्याची चर्चा परिसरात होतं आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे करीत आहेत.