चोरीच्या मोटरसायकली जप्त…!
अमीन शाह
बुलडाणा , दि. १३ :- काल रात्री खामगाव शहरात पोलीस गस्त सुरू असताना डी. पी. रोड भागात एक युवक संशयस्पद हालचाली करतांना आढळून दिसून आला पोलीस समोर असल्याचे पाहून तो आपल्या मोटर सायकल वरून सुसाट वेगात पळून गेला चित्रपटातील दृश्य प्रमाणे पाठलाग करून पोलिसांनी त्यास पकळले त्याची झळती घेतली असता त्याच्या जवळून एक चाब्यांचा गुच्चा मिळून आला अंकुश देशमुख असे अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव असून त्याने मोटर सायकल चोरीची कबुली दिली आहे त्याच्या ताब्यातून मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी पो.का. शेख नवाज यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अंकुश विरोधात भा.द.वि. 122 , 124 नुसार गुन्हा दाखल केला आहे.