Home राष्ट्रीय हरयाणा मध्ये रिपब्लिकन पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्या – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेचे...

हरयाणा मध्ये रिपब्लिकन पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्या – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेचे कार्यकर्त्यांना आवाहान

68
0

भिवणी , दि. २७ :-  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकारांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची 50 वर्षांपूर्वी हरयाणा मध्ये मोठी ताकद होती. हरयाणा राज्य सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाचे मंत्री सहभागी होते. अनेक लोकप्रतिनिधी निवडून येत होते. हरयाणातील ते गतवैभव रिपब्लिकन पक्षाला पुन्हा मिळवून द्या ; त्यासाठी सर्व जाती धर्मियांची रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याखाली एकजूट करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.भिवणी येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ना रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइं चे हरयाणा प्रदेश अध्यक्ष अनिल बाबा तसेच कार्यक्रमाचे आयोजक योगेश चौधरी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी रिपब्लिकन पक्षात ब्राह्मण समाजाचे नेते मुरारीलाल चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला.

त्यानंतर भिवणी मधील आंबेडकर भवन मध्ये कुंदन चौधरी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास ना. रामदास आठवले उपस्थित राहिले.

भीवणी येथील लोकप्रिय समाजसेवक दिवंगत ऍड. ठाकूर बिरसिंग यांच्या जयंती सोहळ्यास ना रामदास आठवले उपस्थित होते. दिवंगत ठाकूर बिरसिंग हे भीवणी मधील लोकप्रिय वकील आणि समाज सेवक होते.त्यांनी गरिबांचे न्यायालयीन खटले मोफत लढून न्याय मिळवून दिला. जनता पार्टी चे सरकार केंद्रात होते तेंव्हा हरयाणा मध्येही जनता पार्टी चे सरकार होते. त्यात ठाकूर बिरसिंग मंत्री होते. दलितांप्रती त्यांना प्रेम होते. सर्व समाजघटकांना ते मदत करीत असत . त्यांनी भिवणी च्या विकासा मध्ये योगदान दिले असल्याचे सांगत ना रामदास आठवले यांनी दिवंगत ठाकूर बिरसिंग यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ठाकूर विक्रम सिंग उपस्थित होते.