Home बुलडाणा धम्मचक्र प्रवर्तन ही ऐतिहासिक घटना अतिशभाई खराटे

धम्मचक्र प्रवर्तन ही ऐतिहासिक घटना अतिशभाई खराटे

424

बुलडाणा , प्रतिनिधी

मलकापूर येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज 64 वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळेस स्थानिक रेल्वे स्टेशन जवळस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले
अशोका विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केली व नागपूर दीक्षाभूमी येथे तथागत गौतम बुद्धांचा विज्ञानवादी,समतावादी बौद्ध धम्माची लाखो लोकांना दीक्षा देत सम्राट अशोकानंतर धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले या ऐतिहासिक घटनेला आज 64 वर्षे पूर्ण झाले यामुळे करोडो जनतेचे उत्थान झाले व हे बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा नेते अतिशभाई खराटे यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले
या धम्मचक्क प्रवर्तन कार्यक्रमास मलकापुर तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे,ता. नेते विलास तायडे,भाई शांताराम सोनवणे,सम्राटभाऊ उमाळे, पॅंथर तालुकाध्यक्ष आकाश इंगळे, भिमराज मोरे, सिद्धार्थ इंगळे, गणेश गायकवाड, सॅम वानखेडे,प्रशांत तायडे,निलेश मोरे,विनोद कोंगळे,सागर मोरे उपस्थित होते