Home मराठवाडा अखेर मधुचंद्राच्या रात्री पळून गेलेली नवरी सापडली

अखेर मधुचंद्राच्या रात्री पळून गेलेली नवरी सापडली

519
0

 

परभणी येथून तांब्यात,

अमीन शाह ,

पैठण येथील एका सोबत जालना येथील एका तरुणी ने लग्न करून मधुचंद्राच्या रात्रीच नगदी व दागिने घेऊन पोबारा केला होता या पळून गेलेल्या नवरी ची माहिती मिळाली असून ती आपल्या पहिल्या पती सोबत परभणी येथे असल्याची माहिती मिळाली आहे ,

या संदर्भात पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार पैठण येथील कृष्णा वानसरे याचा विवाह जुळत नवहता शेवटी तेलवाडी येथील नूर म्होम्मद यांच्या माध्यमातून जालना येथील मानसी पवार याला कृष्णा ला दाखविण्यात आले मुलगी पसंद पडल्या नंतर लग्नाची प्रक्रिया पार पडली होती , लग्नात नवं वधू च्या अंगावर 70 हजाराचे दागीने घालण्यात आले होते इकडे नवरदेव सुहागरात चे स्वप्न पाहत होता तर तिकडे नव वधू पळून जाण्याचा बेत आखत होती अखेर रात्र झाली अन ती नवरी नगदी 50 हजार व 70 हजार चे दागिने घेऊन फरार झाली सर्वत्र शोधा शोध केली मात्र ती दिसून आली नाही त्यामुळे कृष्णा वानसरे व त्याच्या आईने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दाखल तक्रारी वरून पोलिसांनी तपास केला असता पळून गेलेली नवरी विवाहित असून ती परभणी येथे आपल्या नवऱ्या सोबत राहत असल्याची माहिती मिळाली होती या वरून पैठण येथील ठाणेदार भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक परभणी येथे पोहोचला व मानसी पवार यास पैठण येथे आणण्यात आले