Home विदर्भ ग्रामीण पञकारांची लेखनी म्हणजे वृत्तपञाचा आरसा – नाना पटोले

ग्रामीण पञकारांची लेखनी म्हणजे वृत्तपञाचा आरसा – नाना पटोले

52
0

यवतमाळ –  घरादारावर तुळसी पञ ठेऊन ,शोषित पिडीतांचा आक्रोश सातत्याने जगासमोर मांडुन, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी, सतत धडपडत राहणा-या ग्रामीण पञकार बांधवांचे कार्य अतुलनीय आहे. किंबहुना त्यांची लेखनी म्हणजे वृत्तपञाचा आरसा आहे. असे भावपुर्ण विचार, विधानसभा अध्यक्ष मा नाना साहेब पटोले यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील हिवरी येथे गुणवंत विद्यार्थीनी सानिका सुधाकर पवार हिचे कौतुक करण्यासाठी आले होते तेव्हा ते बोलत होते. ते पुढे म्हणाले यवतमाळ ग्रामीण पञकार संघाने मला ७ फेब्रुवारी ला पञकार बांधवांच्या विविध समस्यांचे निवेदन दिले होते. त्यामधील योग्य मागण्या तातडीने सोडविण्याची शासन स्तरावर प्रकीया सुरू असल्याचे सांगितले. ग्रामीण पञकार बांधवांना निश्चितच न्याय मिळवून दिला जाईल असा आशावाद व्यक्त केला. यावेळी ग्रामीण पञकार संघाच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यवतमाळ ग्रामीण पञकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख देवानंद जाधव, प्रमोद गवारकर,दत्तु कुशावार, ज्योतिबा पोटे, पुरुषोत्तम कामठे, प्रेमा पञीवार, निलीमा पाटणकर, अभय पापळकर, दिनेश पाटील, राजेश भागानगरकर, निलेश पवार, धनंजय वानखेडे, विकास गज्जलवार, सुरेश गांजरे, संतोष डोमाळे, विजय गुप्ता, जीवन बोरकर, सुभाष मुनेश्वर, सचीन चौधरी आदी पञकार बांधव यावेळी ऊपस्थीत होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार चेके यांनी केले ,तर आभार प्रदर्शन पञकार देवानंद जाधव यांनी केले,