Home मराठवाडा आ. केराम यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करत मांडवी ग्रामीण रूग्णालयासाठी रूग्णवाहिकेचे लोकार्पन……

आ. केराम यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करत मांडवी ग्रामीण रूग्णालयासाठी रूग्णवाहिकेचे लोकार्पन……

182
0

मजहर शेख, नांदेड

जनतेतून समाधानाची भावना”

 

नांदेड / किनवट , दि.  ०६ – ग्रामीण भागातील रूग्णांना वैद्यकीय उपचारासाठी रूग्णवाहिकेअभावी होत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभुमिवर किनवट माहूर तालुक्यातील प्रा.आ.केंद्रातील रूग्णवाहीकांचा जटील प्रश्न अखेर निकाली निघाला असून दिल्या शब्दाला जागत मांडवी येथील ग्रामीण रूग्णालयासाठी मागणी केलेल्या रूग्णवाहिकेचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आल्याने नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.
माहूर व किनवट तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्ध रूग्णवाहीकांची वास्तविक परिस्थिती भंगार व अतिगंभीर असल्याच्या पार्श्वभुमिवर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना नविन रूग्णवाहीका खरेदीसाठी निधी मंजूर करून मंजूर निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी सतत पाठपुरावा आमदार भिमरावजी केराम हे सातत्याने करीत आहेत. माहूर तालुक्यातील वाई बाजार, वानोळा व किनवट तालुक्यातील इस्लापूर, बोधडी व उमरी बा. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रूग्णवाहीका खरेदीसाठी तर एकूण पाच ठिकाणच्या नवीन रूग्णवाहीका खरेदीची तरतूद आदिवासी उपयोजनेअंतर्गत आ. भिमरावजी केराम यांच्या सततच्या पाठपुराव्याने करण्यात आली.
दरम्यान मागणी केल्यापैकी मांडवी ग्रामीण रूग्णालयांसाठी रूग्णवाहिका उपलब्ध झाली असून आ. भिमरावजी केराम यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसिकर व अन्य अधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि. ५ ऑक्टो. रोजी नविन रूग्णवाहिकेचा लोकार्पन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला असून उर्वरीत ठिकाणच्या रूग्णवाहिका लवकरच उपलब्ध होणार असल्याचे आ. केराम यांनी सांगीतले आहे…