Home महत्वाची बातमी जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या...

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

223
0

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे संपादक यांच्या पत्नीच्या नावे असलेली दुचाकी वाहन नियम बाह्य कर्ज वसुलीच्या नावाखाली बळजबरीने ओढून नेली .

याप्रकरणी पत्रकार संरक्षण समिती सोलापूरचे युवा अध्यक्ष खालीद चंडरकी यांच्या पुढाकाराने व दै. अब तकचे जिल्हा प्रतिनिधी श्री रघुनाथ उडता यांच्या अथक प्रयत्नाने दिलेल्या तक्रारीची जिल्हा उपनीबंधक साहेबांनी तात्काळ दखल घेतली आणि सिद्धेश्वर बँकेची ही कारवाई पुर्णत : बेकायदेशीर व नियम बाहय असल्याचे सुनावले . सबंधित दुचाकी ताबडतोब परत दयावी असे फरमान सुनावले यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष खालीद चंडरकी , दै. अब तकचे संपादक प्रसाद जगताप , जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ उडता , अभिषेक चिलका , मोदीन शेख , रितेश मार्गम , अनिकेत गोरट्याल आदि उपस्थित होते .