Home विदर्भ टायर जाळून अर्धा तास रोखला महामार्ग

टायर जाळून अर्धा तास रोखला महामार्ग

122
0

 

वर्धा / तळेगांव (शा.पं.)  – ( रविंद्र साखरे ) –  येथील राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ वरील टि पाईंटवर शेतकरी विरोधी विधेयक व उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे घडलेल्या अमानवीय अत्याचाराच्या व काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रीयंका गांधी यांना पिडीतेच्या परिवाराला भेटण्यास मज्जाव करण्याकरीता केलेली दंडेलशाही याच्या निषेधार्थ आज दुपारी १ वाजताचे सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रं. . ६ वरील तळेगांव (शा.पं.) टि. पाईन्टवर येऊन टायर जाळुन काॅंग्रेस कमेटी व युवक काग्रेस च्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यातआले.

https://youtu.be/Dueo7qN71zI

दरम्यान दोन्ही बाजुची रहदारी मोठ्या प्रमाणात अर्ध्या पाऊण तासासाठी ठप्प झाली होती. तळेगांव पोलीसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेवुन पेटविले टायर विझवुन लगेच ठप्प झालेली वाहतुक सुरु केली. सदर आंदोलनाचे नेतृत्व सचिन सुरेंद्र राव वैद्य राहणार आर्वी जिल्हा वर्धा कॉर्डिनेटर युवक काँग्रेस प्रदेश यांच्या नेतृत्वात 1)अक्षय बंडू राठोड राहणार शिरपूर आर्वी २)अंगद कृष्णराव गिरधर राहणार आर्वी ३)विजय मधुकर राव सोनटक्के राहणार तळेगाव शिवसेना शहर प्रमुख तळेगाव ४)विशाल कृष्णराव भोके राहणार वाठोडा तालुका आर्वी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख वाटोळा ५)विशाल कृष्णराव साबळे राहणार आर्वी तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस आर्वी ६)रज्जाक लियाकत अली राहणार पिप्री पुनर्वसन तालुका आर्वी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष ७)सुबोध सुरेशराव गोडसे राहणार आर्वी ८) सुरेश धर्मपाल मुंद्रे राहणार आर्वी
यांना ताब्यात घेवुन सुटका काहि वेळातच सुटका करण्यात आली.