Home मराठवाडा अंबड तालुक्यातील महाकाळा येथील सुपुत्र चंद्रकांत सुळे अनंतात विलीन

अंबड तालुक्यातील महाकाळा येथील सुपुत्र चंद्रकांत सुळे अनंतात विलीन

66
0

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना – जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकळा येथील जवान चंद्रकांत महादेव सुळे हे जम्मू काश्मीर मध्ये कर्तव्यावर असताना गुरूवारी २४ सप्टेंबर रोजी कर्तृत्व बजावताना एका अपघातात शहीद झाले.

सात वर्षांपासून ते देशसेवेत होते.दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.वैद्यकिय सुत्रांनुसार त्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे सांगण्यात आले.शहीद चंद्रकांत महादेव सुळे यांचा मृतदेह ताब्यात देण्यात यावा यासाठी काही हितचिंतकांनी रास्ता रोको केला.परंतु स्थानिक पोलिसांनी गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आज शहीद चंद्रकांत सुळे यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर सरकारी इतमामात शहीद चंद्रकांत सुळे यांना जम्मू काश्मीर मध्ये अग्नि देण्यात आला.