Home मराठवाडा किनवट तालुक्यातील मांडवी येथे कोरोना योद्धाचा दुर्देवी मृत्यू.

किनवट तालुक्यातील मांडवी येथे कोरोना योद्धाचा दुर्देवी मृत्यू.

146

मजहर शेख

नांदेड / किनवट, दि: ०१:- सगळीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना मांडवी परिसरात मात्र त्याचा परिणाम दिसून आला नाही याचे श्रेय निश्चितच आरोग्य विभाग,पोलीस यंत्रणा,ग्राम पंचायतीला जात असताना आज मात्र एका पोलीस जवानांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस कॉन्स्टेबल संतोष मठपती (वय 30 ) बक्कल न.594 या कोरोना योध्याचा आज दि 1 ला सकाळीतीन च्या सुमारास नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दुर्देवी मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून मठपती यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
आज पोलीस ठाण्यात सपोनि संतोष केंद्रे,पो उप निरीक्षक शिवप्रसाद कराळे, विजय कोळी सह सर्व कर्मचाऱयांनी श्रद्धांजली अर्पण केली.
खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कर्तव्या बरोबरच आपल्या प्रकृतीला जपावे व जनतेनेही सुरक्षित अंतर ठेवून,मास्क वापरून कोरोना संकटावर मात करावे असे आवाहन सपोनि संतोष केंद्रे यांनी या वेळी केले.