Home परभणी ते व्यापारी गाळे न हटविण्यासाठी गंगाखेडात गाळेधारकांचे उपोषण

ते व्यापारी गाळे न हटविण्यासाठी गंगाखेडात गाळेधारकांचे उपोषण

142

गंगाखेड- बसस्थानकासमोरील न प ने बांधून दिलेले गाळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन हटविण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर गाळेधारकांनी हे गाळे हॅटवू नये या मागणीसाठी गाळ्यासमोरच मंगळवारी उपोषणास प्रारंभ केला आहे. 

गंगाखेड बसस्थानकासमोर सन 2000 नगरपरिषदेने गाळेधारक कडून अमानत रक्कम जमा करून घेत पत्राचे गाळे बांधून दिले. संबंधित गाळेधार का कडुन या दहा हजार रुपये अमानात रक्कम व भाडे तीनशे रुपये प्रतिमहा करण्यात आले. या काळात हातावर पोट असणारे गाळेधारक आपली उपजीविका करत असताना विकासकामांच्या नावाखाली हे गाळे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची कुजबूज गाळेधारकांना लागली. या गाळाच्या बाजूस जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल होत असल्याने उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी हे गाळे हटवावेत अशा नोटिसा सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित गाळेधारकांना दिल्या नोटिसा हातात मिळताच गाळेधारकांची एकच धावपळ सुरू झाली. अनेक राजकीय उंबरटे झिजून काहीच उपयोग न झाल्याने शेवटी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता या भागातील सर्व 95 गाळेधारकांनी त्याच्यासमोर सार्वजनिक उपोषणास प्रारंभ केला आहे. याचे निवेदन त्यांनी तहसीलदार, पोलिस ठाण्यात दिले. या निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर,बालाजी कातकडे,भगवान बडवणे, किशनराव सुर्यवंशि,अतुल सुरवसे, व्यंकट यादव, सय्यद सरवर,
, लखन पारीख,अतुल सुरवसे,किशनराव आडकिने, सय्यद सरवर, सय्यद हुसेन,शिवाजी बडवणे, सय्यद शकील, , सय्यद अखिल,एकनाथ गवळी, विश्वनाथ फुलपगार,राहुल भुमरे,सह गाळेधारकांच्या स्वाक्षरी आहेत. उपोषणाला बसताच पोलीस ठाणेदार शेख साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषण कर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे शहराध्यक्ष इंतेसार सिद्दिकी, सामाजिक कार्यकर्ते गौतम रोहणकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.