Home जळगाव आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच कडुन रुग्णवाहिका घेण्याचा महत्वाचा निर्णय

आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच कडुन रुग्णवाहिका घेण्याचा महत्वाचा निर्णय

218
0

रावेर ( शरीफ शेख )

आदिवासी तडवी भिल एकता मंच सामाजिक संघटनामार्फत पदाधिकाऱ्यांनी गोरगरिब आदिवासी समाजातील जनतेला वेळेवेर उपचार होऊन त्यांचे प्राण वाचवण्यास मदत मिळावी, म्हणुन या आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच संघटनेने रुग्णवाहिका (अँब्युलेंस)घेण्याचा निर्णय घेतला आहे,जेणेकरुन या रुग्णवाहिका मुळे आदिवासी खेडापाड्यातील गर्भवती महिला,आपतकालीन रुग्णांना खुप मोठा दिलासा व जीवनदान मिळण्याचा एकमेव लक्ष या आदिवासी संघटनेचा आहे,त्याचबरोबर ही आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच ही एक अशी सामाजिक संघटना आहे की,ती आदिवासींवर अन्याय,अत्याचार होऊ देत नाही,आणि आदिवासी लोकांना न्याय मिळवुन देण्यासाठी आदिवासी संघटनेचे समाजसेवक,पदाधिकारी नेहमी प्रत्येक विभाग,क्षेञामधे मदतीसाठी तत्पर असतात,हेच ह्या आदिवासी तडवी भिल एकता मंच सामाजिक संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.