Home मराठवाडा “सासुरवास” नवविवाहित मुलीच्या आत्महत्या प्रकरणी सासु , ननंदला ठोकल्या बेड्या

“सासुरवास” नवविवाहित मुलीच्या आत्महत्या प्रकरणी सासु , ननंदला ठोकल्या बेड्या

268
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना – सासु ,ननंदाच्या सततच्या त्रासाला वैतागून जालना शहरात एका बावीस वर्षीय नवविवाहितेने अखेर आत्महत्या केली आहे.सदरची घटना आज सकाळी समोर आली आहे.नवविवाहीत मुलीने काचेवर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.जालना शहरातील कांचन नगर भागात ही घटना घडली.या आत्महत्या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी याप्रकरणी सासु आणि ननंदला अटक केली आहे.सुमन देशमुख असे आरोपी सासुचे नाव आहे तर पुजा मोताळे ही ननंद आरोपी आहे.
*या आत्महत्येप्रकरणी मयत नवविवाहितेच्या बहिणीच्या फिर्यादीवरून सासू आणि ननंदावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घरातील काचेवर सासू आणि ननंद आपणांस त्रास देत असल्याचा उल्लेख सदर मयत नवविवाहितेने केला होता.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सासू आणि सुनेची पोलिसांनी कसून चौकशी केली.आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन करत आहेत.