Home मराठवाडा शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत द्यावी – माजी मंत्री...

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत द्यावी – माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती

276

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

नेहमी ढाण्या वाघाच्या भूमिकेत असणारे लोक आज विद्यमान महाराष्ट्र सरकार मध्ये आहे ते शेतकऱ्यांसाठी ढाण्या वाघाची भूमिका कधी घेणार असा सवाल करत सरकार मधील सर्व ढाण्या वाघ शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत की बोगस बियाणे विकणाऱ्या सोयाबीन बियाणे कंपन्यांच्या बाजूने आहेत असा सवाल देखील लोणीकर यांनी यावेळी केला जालना जिल्ह्यासह 80 पेक्षा अधिक महाराष्ट्रातील पोलिस ठाण्यांमध्ये बोगस सोयाबीन विक्री प्रकरणी सोयाबीन बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असतानादेखील महाराष्ट्र सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे मग सरकारमधील ढाण्या वाघाची भूमिका घेणारे हे सोयाबीन कंपन्यांच्या बाजूने की शेतकऱ्यांच्या बाजूने असा प्रश्न पडतो असेही लोणीकर यावेळी म्हणाले महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा बोगस सोयाबीन विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे धाडस दाखवावं सोयाबीन प्रकरणी शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक करण्यात आलेली असून सोयाबीन बियाणे कंपनी कडून असो की महाराष्ट्र सरकार कडून असो शेतकऱ्यांना केवळ सोयाबीन बॅगच्या 70 टक्के रक्कम (अर्थात 2270 रुपये) न देता शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई देणे अपेक्षित असल्याची बाब देखील लोणीकर यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे निदर्शनास आणून दिली

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरले असून या योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचा लक्षांक देण्यात आलेला नव्हता परंतु महाराष्ट्रात स्वतंत्र झाल्यानंतर मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना संजीवनी प्रदान करणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पूर्णपणे स्थगिती दिलेली असून त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा पूर्णपणे थांबलेले आहेत हे शेतकऱ्यांचे सरकार आहे असं म्हणून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने किमान शेतकऱ्यांना संजीवनी देणाऱ्या या योजनेला दिलेली स्थगिती तात्काळ उठावे व ही योजना पूर्ववत पुन्हा चालू करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे आज केली

जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे झालेल्या बैठकीमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पीक विमा अतिवृष्टी निम्न दुधना प्रकल्पातील अतिरिक्त बाधित क्षेत्र बोगस सोयाबीन बियाणे इत्यादी बाबतीत शासनाच्या वेळ काढू आणि दुर्लक्ष करणाऱ्या भूमिके बाबत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली

जालना जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टी मध्ये सात लक्ष हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असल्याची बाब लोणीकर यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान भरपाई साठी 50000 रुपये देण्याची मागणी केली होती प्रत्यक्षात मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांनी याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही अतिवृष्टीमुळे शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे त्यांच्या शेतीचे पंचनामे करून वेळकाढू पणा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट मदत करणे गरजेचे असून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याची गरज असल्याची भूमिका लोणीकर यांनी यावेळी मांडली

जालना जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्प मध्ये अतिवृष्टीमुळे प्रकल्प पूर्णपणे भरला असून बाधित क्षेत्राच्या बाहेर जाऊन तीन हजार हेक्टर अतिरिक्त जमिनीवर पाणी शिरले आहे त्यामुळे ती जमीन तात्काळ संपादित करण्यात यावी व त्याचा मावेजा आणि नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी देखील यावेळी लोणीकर यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली

पिक विमा कंपन्यांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे पिक विमा कंपन्या पंचनामे करू शकणार नाहीत त्याप्रमाणे वेळेत पंचनामे जर झालेला आहेत तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही परिणामी महाराष्ट्र सरकारने सरसकट शेतकऱ्यांना मदत करून आत्महत्या करण्यापासून वाचवावे अशी कळकळीची विनंती देखील यावेळी लोणीकर यांनी केले

खरीप पिकांबरोबरच जिल्ह्यातील फळबागा देखील पूर्णपणे उध्वस्त झाल्या असून सरकारने फळबागांना देखील तात्काळ मदत देण्याची गरज असून मोसंबी द्राक्ष पपई डाळिंब संत्री यासारख्या अनेक पिकांच्या फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची बाब लोणीकर यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले ऊस कापूस सोयाबीन मूग मका यासारख्या पिकांची देखील पूर्णपणे नासाडी झाली असून सोयाबीन मूग यासारख्या पिकांना जागेवरच कोंब फुटले आहेत अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी जगावं कसं असा सवाल लोणीकर यांनी यावेळी उपस्थित केला.