Home बुलडाणा बहुजन पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी स्वप्नील शिंदे तर शेख इरफान यांची निवड

बहुजन पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी स्वप्नील शिंदे तर शेख इरफान यांची निवड

297

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

अंढेरा , दि. ११ :- येथे आज ११जानेवारी शनिवारी दुपारी बारा वाजता बहुजन पत्रकार संघांची मिटिंग पार पाडली. त्यात सभेच्या अध्यक्ष स्थानी तालुका अध्यक्ष शेख हनिफ तर प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष दीपक नागरे.तथा माजी तालुका अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य राम परहाड होते.
सभेमध्ये शेख हनिफ यांनी ठराव मांडला की स्वप्निल शिंदे यांनी तालुकाध्यक्ष व्हावे ठराव मांडला असता तो सर्वानुमते पारित होऊन पत्रकार स्वप्नील शिंदे यांची अविरोध निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्षपदी शेख इरफान यांची तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून राधेश्याम ढाकणे यांची तर कोषाध्यक्ष म्हणून सैयद साकीन यांची निवड करण्यात येऊन सदस्यांमध्ये शेख हनिफ राम परहाड भगवान इंगळे उद्धव बनसोडे ज्ञानेश्वर म्हस्के शंकर पांगरकर यांचा समावेश करण्यात आला.