Home मराठवाडा गोंधळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ पत्रकार रामभाऊ उगले यांचे निधन

गोंधळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ पत्रकार रामभाऊ उगले यांचे निधन

289

जालना‌ – लक्ष्मण बिलोरे

मराठवाडा विभागाच्या,जालना जिल्ह्यातील गोंधळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ पत्रकार रामभाऊ हरिभाऊ उगले,वय ६० वर्षे यांचे प्रदीर्घ आजाराने आज गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक कन्या असा छोटासा परिवार आहे.त्यांचा अंत्यसंस्कार २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जालना येथील रामतीर्थ स्मशानभूमीत होणार आहे.

हे पण वाचा

सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार रामभाऊ उगले यांच्या निधनाने जालना जिल्ह्यातील पत्रकारितेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जालना शहरात दैनिक मापदंड चे दिवंगत रामभाऊ उगले हे काही काळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली.रामभाऊ उगले यांचे निकटवर्तीय मित्र विठ्ठल अंभोरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, रामभाऊ उगले यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्हा भरात ठसा उमटवला होता.रेणूका देवी सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात ते अग्रणी होते.दिवंगत रामभाऊ उगले यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.