Home विदर्भ शेतकरी, शेतमजुरांना नुकसान भरपाई देण्याकरिता प्रहार चे तहसीलदाला निवेदन….!

शेतकरी, शेतमजुरांना नुकसान भरपाई देण्याकरिता प्रहार चे तहसीलदाला निवेदन….!

81
0

प्रशांत नाईक

अमरावती / धामणगांव – आज दिनांक 24-9-2020 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष धामणगाव रेल्वे यांच्या वतीने धामणगाव तालुक्यातील महिन्याभरापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे खरीप पिक तूर सोयाबीन कापूस यांचे शंभर टक्के नुकसान झाले व ग्रामीण भागात लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले म्हणून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून व पिकाची पाहणी करून तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी याकरिता माननीय भगवान जी कांबळे तहसीलदार धामणगाव रेल्वे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवीण भाऊ हेंडवे (जिल्हाध्यक्ष) ऋग्वेद काळे ( प्रसिध्दी प्रमुख धा.रे. विधानसभा ) अक्षय धोपटे (तालुका अध्यक्ष विद्यार्थी संघटना‌ धा.रे) , प्रशांत भाऊ हुडे , प्रशांत नाईक, किशोर भाऊ जाधव, रुपेश टाले, विजय भगत,प्रेम हेंडवे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.