Home विदर्भ भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

581
0

देवानंद जाधव 

यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस किलो मिटर अंतरावर भांब राजा येथे प्रशस्त पथकर नाका ऊभारला आहे. ऊर्वरित कामावर अत्यंत वेगाने अंतीम हात फिरवला जात आहे. या महामार्गावरुन दररोज हजारो वाहनांची आंणि वाटसरुंची ये जा होत असते .जलद गतीने निर्माण केलेल्या सिमेंट रोडवर, अपघाताचीही मालिका सुरू झाली आहे. टोल टॅक्स नाका प्रारंभ करण्यासाठी कोणत्याही क्षणी नारळ फुटू शकतो. ईतकी तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पथकर नाका निर्माण केला आहे. जागोजागी सी.सी टिव्ही कॅमेरे लावले आहे. आभाळाशी स्पर्धा करणार्या खांबावरील विद्युत रोषनाई अंधाराला चिरत तर नेतेच, शिवाय माणसाला नेञसुख देऊन जाते. एकंदरीत पथकर नाका नव्या नवरी सारखा नटला आहे. वाहन धारक आणि वाहनाचा भार सोसणार्या सिमेंट रोडवरुन ये जा करणार्यां हजारो वाहनधारकांच्या खिशाचा भार भांब राजा च्या टोल टॅक्स नाक्यावर हलका हलका होणार आहे.