Home मराठवाडा पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

145
0

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…!

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

पैठण – येथील जायकवाडी नाथसागराचे सर्व अठ्ठावीस दरवाजे खुले करण्यात आले असून आज शनिवारी आठ वाजता नाथसागरातून ४७१६० क्यूसेस पाणी गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू आहे.नाथसागरात ६४८२९ क्यूसेस पाण्याची आवक सुरू आहे.यामुळे गोदावरी नदीला महापूर येणार आहे.गंगथडीच्या लोकांना पुराच्या पाण्यामुळे सुरक्षीतस्थळी स्थलांतरित व्हावे लागणार आहे.पुरग्रस्तांच्या अन्नधान्याची आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था काय करण्यात आली,या बाबतीत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी जाहीर केले नसल्याने पुरग्रस्तांची फटफजिती होणार काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने अंबड-घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या बऱ्याच गावांमध्ये पुराचे पाणी घुसून हाहाकार उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.२००६ साली गोदावरीला महापूर आल्याने प्रशासन हतबल झाले होते.महापुराचे संकट येण्यापूर्वीच प्रशासनाने सतर्क राहावे.संभाव्य पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था करण्यात यावी.कोरोना महामारीच्या उपाययोजनेत जिल्हा प्रशासन व्यस्त असताना महापुराच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सतर्क राहावे लागणार आहे.प्रशासनातील आरोग्य, पोलिस, महसूल, पुरवठा, आणि ग्रामपंचायत या विभागाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.