Home जळगाव अपनी गल्ली तर्फे आदर्श शिक्षक मुजावर यांचा गौरव समारंभ

अपनी गल्ली तर्फे आदर्श शिक्षक मुजावर यांचा गौरव समारंभ

100
0

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट आदर्श शिक्षक म्हणून महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक ११, सुप्रीम कॉलनी जळगाव शहर येथील कार्यरत शिक्षक शकील शफी मुजावर यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल हाजी अहमदनगर मधील अपनी गल्ली येथील रहिवाशां तर्फे त्यांचा सत्कार समारंभ शहरे काजी मुफ्ती अतिकुर रहमान यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष मन्यार बिरादरी फारुक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी प्रास्ताविक फारुख शेख यांनी सादर करून शाकीर मुजावर सरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रीडा व सामाजिक क्षेत्रात सुद्धा ज्ञान दिल्याने त्यांची ही निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच मनपा तर्फे शिक्षकांना पूर्ण पगार मिळत नसतांना सुद्धा हे शिक्षक इमाने इतबारे आपली सेवा देत आहे म्हणून या पुरस्काराला अनन्य साधारण महत्व असल्याचे नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना शकील मुजावर यांनी म्हटले की आज माझा सत्कार झाला हा मी आयुष्यभर विसरणार नाही व अपनी गल्ली हे माझे कुटुंब आहे त्यांच्या हातून हा सत्कार होत असल्याने या गल्लीतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य आता मला करावे लागणार यात तिळमात्र शंका नाही असे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी पवित्र कुराण व हदीस यांचे संदर्भ देऊन शिक्षकाचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे आभार आपली गल्ली चे अध्यक्ष आताऊल्ला खान यांनी मानले.
या कार्यक्रमास शफी मुजावर, अताऊल्ला खान, ताहेर शेख, तय्यब शेख, अश्फाक मुजावर,आबीद काझी,सलीम शेख,हुजेफा शेख, शोएब देशमुख ,वसीम मिर्झा, हरीश मिरझा, उमर शेख, तलाह शेख, हस्सान मिर्झा,हाफिज इब्राहिम पीरजादे, यांची उपस्थिती होती.