Home मराठवाडा फारोळा ग्रामपंचायतचे तीन सदस्यांचे सदस्यत्व अपाञ

फारोळा ग्रामपंचायतचे तीन सदस्यांचे सदस्यत्व अपाञ

100
0

रवि गायकवाड

औरंगाबाद / बिडकीन , दि. ११ :- आज दि.१० रोजी पैठण तालुक्यातील बिडकीन नजीक असलेली फारोळा ग्रामपंचायतच्या विरोधात राजेंद्र किसनराव धरपळे यांनी दाखल केलेला अपिलीय विवाद प्रकरणात मा.जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचे न्यायालयाने दि.२०.१२.२०१९ रोजी फारोळा ग्रामपंचायत विषयांवर निर्णय पारित केले असुन यात फारोळा ग्रामपंचायते तीन सदस्यांचे सदस्यत्व अपाञ ठरविण्यात आले.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१),(ज-३),व १६ नुसार मा.जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचे न्यायालयाने सुनावणी केली असुन यात फारोळा ग्रामपंचायत चे कार्यरत असलेले ग्रामपंचायत सदस्य केशरबाई किसन खोतकर,सलिम इब्राहीम पठाण,अन्वरबी खान पठाण सर्व रा.फारोळा ता.पैठण जि.औरंगाबाद यांना महाराष्ट्र अधिनियम १९५८ चे कलम १४ (१),(ज~३) व १६ नुसार वरिल तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने अनर्ह (अपाञ ) ठरविण्यात आले.

Unlimited Reseller Hosting