Home विदर्भ वर्धमनेरी येथे इसमाची निर्घुन हत्या…!

वर्धमनेरी येथे इसमाची निर्घुन हत्या…!

235

पोलिसांचा वचक गेला कुठं…!

 

तळेगांव (शा.पं.) :- *रविन्द्र साखरे* येथील तळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वर्धमनेरी येथे रात्री एका युवकाने ३८ वर्षीय ईसमाची झोपेत हत्या केल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार यातील मृतक सुखदेव सलामे वय वर्षे ३८ रा. वर्धमनेरी व आरोपी भगवंता वलके वय २८ वर्षे रा. वर्धमनेरी हे दोघेही जंगलातुन मोळी अाणायला जात होते व आपली उपजिविका चालवत होते. मागील एक महिण्यापुर्वी आरोपी व मृतकात कुर्‍हाड चोरीवरुन चांगलाच वाद झाला होता. ज्यात मृतकाने आरोपीला मारले होते. तेव्हा त्याचा राग आरोपीने मनात धरुन ठेवला असता गुरुवारला रात्री ७ वाजताचे दरम्यान मृतक हा घरी झोपला असतांना मृतकाच्या घरी जाऊन मृतकाच्या डोक्यावर झोपेतच कुर्‍हाडीने वार करुन जागीच ठार केले.

घटनास्थळावरून आरोपीने केला होता पोबारा

आरोपीने खून केल्यानंतर घटनास्थळावरून पोबारा केला असल्याचे ग्रामस्थ बोलत होते अथक प्रयत्नांनंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला, घटनास्थळावरून पळल्यानंतर आरोपी गावशेजारील शेतामध्ये लपून बसला होता असे काहींचे म्हणणे आहे. आणि तेथूनच गावकऱ्यांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात यश आले असल्याचे समजते.

आरोपीवर याआधीही गुन्हे दाखल

यातील आरोपीवर याआधीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हा सराईत गुन्हगार असल्याचे सुद्धा बोलल्या जात आहे.याआधी आरोपीवर मारहाण करणे, तसेच दारू च्या सुद्धा काही केसेस असल्याचे समजते, आरोपी हा याआधी तीन महिने तुरुंगात होता.

तळेगांव पोलिसांचा वचक गेला कुठे

तळेगांव परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेले चोर्‍या, भांडण तंटे, अवैध व्यवसाय, खुनाचेसत्र थांबायचे नाव घेत नाही. तळेगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुठे ना कुठे खुन, चोरी, राष्ट्रीय महामार्गावरील अवैध व्यवसाय, अवैध दारुची वाहतुक यामुळे पोलिसांचा गुन्हेगारावंर वचकच उरला नसुन पोलीसांचा धाक संपल्याची प्रचिती तळेगांव परिसरातील नागरिकांना येत आहे.