भाजपा कार्यकत्यात तुफान राडा हाणामारी…!

  60
  0

  सुनील नेवे यांच्या अंगावर शाई फेकली

  अमीन शाह

  जळगाव , दि. १० :- आज भाजप जिल्हाध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच कार्यकर्ते आपसात भिडले यात खडसे समर्थक असलेले सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आली सोबतच नेवे यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. दोन घटांनी घोषणाबाजी करत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून शाई फेक केली हा सर्व प्रकार रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या समोर घडला . आज जळगाव जिल्हा भाजपा अध्यक्षांची निवड होत होती.त्यासाठी आज केंद्रीय राज्य मंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थिती होती .शहराध्यक्ष निवडीवरून हा वाद झाला. भुसावळ येथील भाजप कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांना निवेदन दिले, त्यावेळी हा गोंधळ झाला. यात भाजपचे सरचिटणीस सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आली आहे. सुनील नेवे यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.कार्यकर्त्यांचा राडा सुरू झाल्यानंतर रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन हे सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळाले. या दरम्यान, दानवे आणि त्यांचे कार्यकर्ते सभेतून निघून गेले .

  Unlimited Reseller Hosting