Home जळगाव कोविड सेंटरच्या रस्ता दुरवस्थेने आरोग्य यंत्रणा झाली हैराण

कोविड सेंटरच्या रस्ता दुरवस्थेने आरोग्य यंत्रणा झाली हैराण

59
0

 लियाकत शाह

भुसावळ – पावसानंतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरला जोडणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाल्याने या रस्त्यावरुन रुग्णांना घेवून जाताना आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील बहूतांश मुरुमही पावसाने वाहून निघाला मात्र प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्याचे दुर्दैवे आहे. कोविड सेंटरला जोडणाऱ्या रस्त्यांची स्थिती बिकट शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरला जोडणाऱ्या दोन्ही रस्ते मातीचे आहेत. शेकडो विद्यार्थ्यांचा यापूर्वी अधिवास असलेल्या या वस्तीगृहाकडे यंत्रणेचे लक्ष गेले नाही मात्र आता कोविड केअर सेंटरमुळे या रस्त्यावरुन विद्यार्थी कसे वापरत असतील? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कोविड सेंटरमध्ये जाताना आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. बरेच डॉक्टर, सफाई कर्मचारी, अन्न व पाणी पुरवठादार या मार्गाने कोवीड सेंटरला मोटारसायकलने जातात. चिखलामुळे त्यांना या रस्त्यावरुन चालणेही कठीण झाले आहे. प्रशासनाने रस्त्यावर चिखल होऊ नये, म्हणून मुरुम टाकला होता मात्र पावसात बराच मुरुमचही वाहून निघाला तर काही ठिकाणी कच्चा मुरुम असल्याने चिखलात रुपांतर झाले आहे. याच रस्त्यावरुन रुग्णवाहिकांनाही वापरावे लागते. यामुळे आता या ठिकाणी पक्का रस्ता तयार करावा, तुर्त होणारी अडचण थांबवावी अशी मागणीही वैद्यकिय पथकांतील डॉक्टर व आरोग्य सेवकांनी केली आहे.