Home जळगाव अल्पसंख्यांक समाजासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा फायदा...

अल्पसंख्यांक समाजासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा फायदा घ्या – गफ्फार मलिक

287
0

रावेर (शरीफ शेख) 

महाराष्ट्र शासन मार्फत अल्पसंख्यांक समाजासाठी त्यात मुस्लिम ,शिख, ख्रिश्चन,बुद्धिष्ट ,पारसी व जैन समाजाचा अंतर्भाव आहे त्यांच्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे त्यात प्रामुख्याने विदेशात उच्च शिक्षणासाठी पन्नास लाख रुपये, वैद्यकीय शिक्षणासाठी दहा लाख रुपये ,विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षणासाठी पाच लाख रुपये असे सहकार्य महाराष्ट्र शासन देत असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
नुकतीच त्यांनी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित दादा पवार व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली.

शालेय शिक्षण, उच्च शिक्षण व विदेशातील शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्धतेबाबत चर्चा केली असता दोघी मंत्रीमहोदयांनी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणा साठी निधीची ची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन दिले आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत काही माहिती अथवा मार्गदर्शन पाहिजे असल्यास त्यांनी शनिपेठ जळगाव येथील कार्यालयात हाजी गफ्फार मलिक यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान केले आहे.