Home विदर्भ तळेगांव आठवडी बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी, प्रशासनाच्या आदेशाला झुगारून जबरदस्तीने भरविला बाजार

तळेगांव आठवडी बाजारात व्यापाऱ्यांची मनमानी, प्रशासनाच्या आदेशाला झुगारून जबरदस्तीने भरविला बाजार

162
0

पोलिसांनी पार पाडली फक्त बघ्याची भूमिका तर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गर्दी जमवत भरला बाजार

 

वर्धा /  तळेगांव (शा.पं.) : – कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तळेगावचा शनिवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.त्या अनुषंगाने सकाळी गावात दवंडी सुद्धा देण्यात आली.तरी मात्र, कोरोनाची धास्ती न घेता शनिवारचा आठवडी बाजार आदेश झुगारुन भरलाच.विशेष म्हणजे बाजारात पोलीसांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते. परंतु त्यांना कोणाचा तरी फोन आल्याने त्यांनी सुद्धा फक्त बघ्याची भूमिका मोठ्या इमानदारीने पार पाडली.शनिवार च्या बाजारात यावेळी व्यापारी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांत हमरीतुमरी झाल्यावर व्यापारी ऐकत नसल्याचे पाहून पोलीसांना सुद्धा बोलावण्यात आले होते.
कोरोना विषाणूची बाधा तसेच प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पहिल्या लाॅकडाऊन पासुनआठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिले होते. व आठवडी बाजार बंद सुद्धा होता परंतु अनलाॅक एक सुरु झाल्यानंतर सर्व अटि व नियमानुसार आठवडी बाजार भरविण्यास मुभा देण्यात आली होती परंतु आठवडी बाजारामध्ये सर्व अटि व नियमांना भाजीपाला विक्रेतांकडुन तिलांजली दिल्या जात असल्याने व दिवसेंदिवस जिल्हात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने दोन आठवड्यानंतर आठवडी बाजार पुर्णत: ग्रामपंचायत प्रशासनाकडुन बंद करण्यात अाला. तेव्हा तरीही बाहेरील भाजीपाला विक्रेते आर्वी रोडने मार्केटमधील स्थानीक दुकानांसमोर शनिवारी आपली दुकाने लावत होती. त्यामुळे मार्केट मधील स्थानिक दुकानदारांना त्याचा त्रास होत असल्याने त्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या तेव्हा त्या भाजीपाला विक्रेत्यांना त्या स्थानिक दुकानदारांनी शनिवारी आर्वी मार्गाने त्यांच्या दुकानासमोर दुकाने लावण्यास मनाई केल्याने बाहेरगावातील भाजीपाला विक्रेते व अन्य व्यावसायीकांनी ग्रामपंचायतने दि. ११ सप्टेंबरला शनिवार बाजार बंद च्या दिलेल्या दवंडीला झुगारुन बाजाराचे ठिकानी बाजार भरविला तेव्हा स्थानिक ग्रामपंचायतचे प्रभारी सचीेव अमोल उदखेडे व ग्रा.पं. कर्मचार्‍यांनी त्या व्यावसायीकांना दुकाने लावण्यास मनाई करुनहि न जुमानता आपली दुकाने सुरुच ठेवली तेव्हा ग्रामपंचायत सचिवांकडुन पोलिसांना पाचारण करण्यात आले परंतु पोलीसांनाहि न जुमानता भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरुच ठेवली शेवटी ग्रामपंचायत सचिव व इतर कर्मचारी तसेच पोलीसांनी माघार घेवुन शेवटी अापलाच काढता पाय घेतला. शेवटी भाजीपाला विक्रेत्यांनी कोणालाही न जुमानता आपली दुकाने थाटुन शनिवारचा आठवडी बाजार भरविला.

ग्रामपंचायत प्रशासणाचा हलगर्जीपणा उठू शकतो नागरिकांच्या जीवावर

तळेगांव चा आठवडी बाजार जर का शनिवारी बंद ठेवायचाच होता. तर प्रशासनाणे एक दिवस अगोदरच तशा सूचना भाजीविक्रेत्याना देने गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायत चे सचिव अमोल उतखेडे यांनी ऐन वेळेवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सांगितल्याने त्यांनी वेळेवर धावपळ करत दवंडी दिली सुद्धा पण या दवंडी ला ठेंगा दाखवत बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी बाजार भरवलाच.