Home बुलडाणा अखेर गुन्हा दाखल झाल्याने मृतकावर अंत्यसंस्कार;

अखेर गुन्हा दाखल झाल्याने मृतकावर अंत्यसंस्कार;

528

 

 

हनिफ शेख ,

अंढेरा

अमोना येथील ज्ञानेश्वर रक्ताडे यांना शुक्रवारी (दि.१०) विशिष्ट समाजाच्या लोकांनी मारहाण झाली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बुलडाणा येथे दवाखान्यात भरती केले होते. काल, १२ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र २० तास उलटूनही याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने पार्थिव ताब्यात घेण्यास आज, १३ सप्टेंबरला मृतकाच्या नातेवाइकांनी नकार दिला होता त्यासाठी रस्त्यावर उतरून काही नातेवाइकांनी रास्ता रोकोही केला होता. अखेर पोलिसांनी काल रात्रीच संशयित म्हणुन ताब्यात घेतलेल्या पाच आणि आणखी एक अशा सहा आरोपीवर गुन्हा दाखल केल्याने रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले.
मृतक ज्ञानेश्वर रक्ताडे यांचे भाऊ निवुर्ती आत्माराम रक्ताडे रा अमोना ,ता चिखली यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चंद्रभान सोमाजी वानखेडे, किशोर रमेश मघाडे,राहूल रमेश मघाडे,सचिन रमेश मघाडे,अमोल सुखदेव वानखेडे,गौतम पांडुरंग वानखेडे सर्व रा अमोना ,ता चिखली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.शेतीच्या वादातून मारहाण झाल्याने ज्ञानेश्वर रक्ताडे याचा मृत्यु झाल्याचे समोर येत आहे.

पोलिसांनी केली कार्यवाही ,

या खून प्रकरणी पोलिसांनी आज काही युवकावर गुन्हा दाखल केल्या मूळे जमाव शांत झाला व मृतकवर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी भा , द , वि , 302 , 343 , 141 , 148 , 149 , 504 , नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार नरेंद्र ठाकरे हे करीत आहे ,