Home नांदेड लोहा उपजिल्हा रुग्णालयास वसुधरारंत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव धावे.

लोहा उपजिल्हा रुग्णालयास वसुधरारंत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव धावे.

346

पञकार संरक्षण समीती नांदेड दक्षिण विभाग यांची मागणी 

नांदेड :- लोहा उपजिल्हा रुग्णालयास वसुधरारंत्न राष्ट्रसंत डाॕं.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पञकार संरक्षण समीती नांदेड दक्षिण विभाग यांच्या कडुन मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या तर्फे मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , आरोग्य मंञी राजेश टोपे व नांदेड जिल्हा पालकमञी अशोकराव चव्हाण साहेब आदिना निवेव्दनाव्दारे करण्यात आली आहे .
वसुधरारंत्न ,राष्ट्रसंत ,प.पू. डाॕं.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासुन तमाम मानवजाती साठी श्रेष्ठ असे कार्य करत त्यांनी देह त्यागला . अध्यात्मिक व स्वातंत्र्याच्या आदोलंनात त्यांनी आपला सहभाग नोंदवून आनेकदा तुरुंगवास भोगला .स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांसाठी सुद्धा कार्य केले आहे .त्यांनी समाजासाठी व राष्ट्रासाठी अहोरात्र कार्य करत तमाम मानव जातीचे कल्याण करण्यासाठी त्यांनी आपले १०५ वर्षांचे आयुष्य खर्ची घातले . महाराजांचे भक्त गण हे सर्व समाजाचे व सर्व धर्माचे लोक आहेत . त्यांचे कार्य सर्व धर्मिय व सर्व समावेशक समाजामध्ये लोककल्याणकारी, समाजाभिमुख, राष्ट्रशक्ती सर्वधर्म, समभाव शिकवणारे विचार रुजवून समाज कल्याण केले . म्हणून लोहा उपजिल्हा रुग्णालयास वसुधरारंत्न राष्ट्रसंत डाॕं.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव धावे अशी मागणी पञकार संरक्षण समीती नांदेड दक्षिण विभाग यांच्या कडुन करण्यात आली आहे . निवेदनावर पञकार संरक्षण समीती नांदेड दक्षिण विभाग अध्यक्ष प्रशांत बारादे राऊतखेडकर कार्याध्यक्ष विरभद्र एजगे उपाध्यक्ष शुभम डांगे आदीच्या स्वाक्षय्रा आहेत .