Home विदर्भ पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या

पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या

737

 


अमीन शाह

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील वायगाव गोंड येथे पत्नीने पतीच्या नेहमीच्या दारुच्या जाचाला कंटाळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना रात्रीच उघडकीस आला आहे. मृतकाचे नाव मुरर्लिधर नथ्थूजी पिजकाटे वय ५२ राहणार वायगाव गोंड असे आहे.तर आरोपी पत्नीचे नाव नंदा मुर्लिधर पिचकाटे असे आहे.

.मुर्लिधर हा नेहमीच दारू पिऊन घरी आल्यानंतर कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याने पत्नी नंदा पिजकाटे हि त्याच्या जाचाला कंटाळली होती. सोमवारी रात्री मुर्लिधरने दारू पिऊन नंदाला मारहाण केली.यावेळी नंदाला राग अनावर झाला आणि तीने
जवळच असलेल्या काठीने मुर्लिधर वर काठीने वार केले यावेळी तो मुर्लिधर पलंगावर पडला असता नंदाने पुन्हा काठीने वार केल्याने मुर्लिधर यांचा जागीच मृत्यू झाला.

व्य घटनेची माहिती मुर्लिधर याचा भाचा स्वप्नील घोडे याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून या घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलिसांना मिळताच उपविभागीय अधिकारी भिमराव टेळे समुद्रपुरचे ठाणेदार हेमंत चांदेवार, पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे, यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवित आरोपी पत्नी नंदा पिजकाटे हिला अटक केली.पुढिल तपास समुद्रपुर पोलिस करीत आहेत