Home विदर्भ भारतीय जनता पार्टी पांढरकवडा तालुक्याच्या वतीने भव्य घंटानाद आंदोलन

भारतीय जनता पार्टी पांढरकवडा तालुक्याच्या वतीने भव्य घंटानाद आंदोलन

165

दार उघड.. उध्दवा.. दार उघड

‌ यवतमाळ – महाराष्ट्रातील सर्व धर्मियांचे प्रार्थना व धार्मिक स्थळे सुरू करण्यात यावे. या मागणी साठी भारतीय जनता पार्टी पांढरकवडा तालुक्याच्या वतीने
भव्य घंटानाद आंदोलन आज करण्यात आले. कोरोना अनलाॅक मधे इतर सर्व आवश्यक सेवा पुर्ववत करण्यात आल्या त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा व श्रद्धेचा सन्मान करून मठ,मंदिर, मशिद,बुद्धविहार, गुरुद्वारे,जैन स्थानक,चर्च,दर्गा व प्रार्थना स्थळे तात्काळ उघडी करावी.या जनभावनेच्या मागणी साठी महाराष्ट्रभर भाजपाचे घंटनाद आज आंदोलन झाले आहे.भारतीय जनता पार्टी यवतमाळ शहरच्या वतीने राम मंदीर , साई मंदीर, दुर्गा मंदीर,संतोषी माता मंदिर, गोपाळकृष्ण मंदीर, जगदंबा माता मंदिर केलापुर येथे मोठया प्रमाणात घोषणा देऊण आंदोलन करण्यात आले यावेळी *मा.श्री. संतोष भाऊ चिंतावार , मा.श्री. मदनभाऊ जिद्देवार मा.श्री.विवेक अंगाईतकर, नगरसेवक श्री बंटी जूवारे, नगरसेविका रिताताई कनोजे , नगरसेविका रोडेताई श्री. दिलीप मुथा शहर अध्यक्ष पांढरकवडा यांच्या नेतृत्वाखाली शहरात व तालुक्यातील आंदोलन यशस्वी झाले.
यावेळी जेष्ठ भाजप नेते बंडु कर्मरकर ,श्री रवि नस्कुलवार, श्री संजय घाडवे ,महिला आघाडी सौ. कमलताई पार्लावार, युवा मोर्चाचे बाला कायपेलवार, मोठया प्रमाणात विविध आंदोलन स्थळी भाजपचे पदाधिकारी मंदिराचे सदस्य व कार्यकर्ते नगरसेवक व नगरसेविका या घंटानाद आंदोलनाला उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी पांढरकवडा तालुका