Home जळगाव खाजगी पशू वैद्यकीय डॉक्टरांचा कोरोना विमा योजनेत समावेश करावा… खाजगी पशू वैद्यकीय...

खाजगी पशू वैद्यकीय डॉक्टरांचा कोरोना विमा योजनेत समावेश करावा… खाजगी पशू वैद्यकीय संघटनेने केली मागणी

154

रजनीकांत पाटील

अमळनेर :- शासनाने गेल्या १९ वर्षांपासून पदभरती न केल्याने खाजगी पशू वैद्यकीय डॉक्टर शासकीय कामात सहभाग घेत असल्याने त्यांना कोरोनाचे विमा कवच पुरवावे अशी मागणी खाजगी पशू वैद्यकीय संघटनेने केली आहे.
लाळ खूळगट लस जनावरांना देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकताच कार्यक्रम जाहीर केलेला आहे. जनावरांना लसीकरण करून नंबर टँगीकरण करून शासनास माहिती सादर करावयाची आहे. परंतु पशुवैद्यकीय विभागाकडे मनुष्यबळ अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे हा कार्यक्रम प्रत्येक शेतकऱ्यांपर्यन्त पोहोचू शकत नाही. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील खाजगी पशू वैद्यकीय संघटनेला विचारणा केली असून यात खाजगी पशू वैद्यकीय डॉक्टर ही सहभागी होणार आहेत. सर्वांनी मिळून हे काम केले नाही तर शेतकऱ्यांचे भविष्यात जर जनावरांना लाळ खुरकट या रोगाची लागण झाली तर त्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. कारण या रोगात दूध देणाऱ्या जनावराचे दूध देने बंद होते किंवा काही वेळेस जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे व जनावराचे नुकसान होऊ नये म्हणून खाजगी पशू वैद्यकीय डॉक्टर हे तयार झाले आहेत. परंतु आताची परिस्थिती पाहता कोरोना सारख्या आजाराने शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत जर का डॉक्टराना कोरोणाची लागण झाली तर प्रत्येक डॉक्टरांना प्रशासनाने 50 लाखाचे विमा कवच द्यावे. मग ते खाजगी असो अथवा सरकारी दोन्ही डॉ ना लागू करावे या पद्धतीची मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी विमा योजनेत खाजगी पशू वैद्यकीय डॉक्टर यांचा समावेश करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील, पशुधन पर्यवेक्षक तसेच मा.सभापती पंचायत समिती अमळनेर यांनी केली आहे.