Home महत्वाची बातमी प्रेमाच्या मोह  जाळ्यात ओढून खंडनि उकळण्याचा प्रयत्न ,

प्रेमाच्या मोह  जाळ्यात ओढून खंडनि उकळण्याचा प्रयत्न ,

421

 

 

पती पत्नी अडकले पोलिसांच्या जाळ्यात ,

अमीन शाह , हनिफ शेख

बुलडाणा , शेत मालकाशी प्रेमाच्या गप्पा मारून त्याला आपल्या मोह पाशात फसवून खडणी वसूल करणाऱ्या एका महिले सह तिच्या पतीला अटक करण्यात आल्याची घटना अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनचरवाडी येथे घडली असून या संदर्भात पोलीस विभाग कडून मिळालेल्या माहिती नुसार देवळगावमही येथील एक शेतकरी हे आपल्या शेतात काम करण्यासाठी अनचरवाडी येथील शेत मजूर बोलावतात त्याच्या शेतात मुकीनदा खिल्लारे हे नेहमी आपल्या पत्नी व इतरां सह कामला येत होते सहा महिन्या पूर्वी अंढेरा शिवारात असलेल्या त्यांच्या शेतात पत्नी अश्विन खिल्लारे व पती नितीन हे कामा साठी आले होते त्या वेळी त्यांची शेत मालक सोबत ओळख झाली व मोबाइल नंबर ची देवाण घेवाण झाली या नंतर शेत मालक व अशविनी यांचा मोबाईल वर नेहमी बोलणं व्हायचा हळू हळू हे बोलणं वाढला व दोघांची मैत्री झाली व जवळीक निर्माण झाली याची कुन कुन घरच्यांना लागली व त्यांच्या डोक्यात एक प्लान आला त्यांनी शेत मालक व अशविनी चा बोलणं रेकार्ड केला व मग शेत मालक याला ही रेकर्डिंग सार्वजनिक करून बदनामी करण्याची धमकी देऊन पैशाची मांगनि करण्यात आली बदनामी च्या भीती पोटी शेतमालक यांनी मेरा खुर्द येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत अश्विनी च्या खात्यात 20 हजार जमा केले त्या नंतर मात्र या शेत मजूर दाम्पत्याची लालसा आणखीन वाढली व त्यांनी हे प्रकरण मिटविण्यासाठी व स्टॅम्प पेपर वर लिहून देण्यासाठी त्या शेतमालकास 6 लाख रुपयांची खंडनि मागितली याला वैतागून शेत मालकाने स्थानिक गुन्हे शाखा येथे तक्रार दाखल केली या खडणी चा पहिला हफ्ता 2 लाख रुपये देण्याचे ठरले आज पोलिसांनी सापळा रचला खडणी चे पैसे घेण्यासाठी आलेल्या पती नितीन खिल्लारे व पत्नी अश्विनी खिल्लारे रा , अनचरवाडी यांना रंगेहाथ अटक करण्यात आली , या प्रकरणी अंधेरा पोलिसात गुन्हाकलम 384/385/34 भ़ा द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आज झालेल्या कार्यवाहीत , जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ , दिलीप भुजबळ पाटील , स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख , महेंद्र देशमुख , यांच्या मार्गदर्शनाखाली पो , नि , नागेशकुमार चतकर , पो , उप , नि मुकुंद देशमुख , रघुनाथ जाधव , विजय दराडे , भरत जनगले , गीता बामनडे , शिरीकांत चिंचोले यांनी सहभाग घेतला असून देऊलगावराज तालुक्यातील हानी ट्रे प ची ही तिसरी घटना आहे ,