Home विदर्भ अफरातफरीच्या प्रकरणात तळेगांव पोलीस राजकीय दबावात काम करत असल्याचा प्रकाश वाघमारे यांचा...

अफरातफरीच्या प्रकरणात तळेगांव पोलीस राजकीय दबावात काम करत असल्याचा प्रकाश वाघमारे यांचा आरोप

192

पत्रकार परिषदेत पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह

ठाणेदार राठोड यांच्यावर गंभीर आरोप

अन्यथा पोलीस अधीक्षकांच्या दालनात अर्धनग्न ठिय्या

वर्धा / तळेगांव शा पंत – तळेगांव येथील प्रकाश वाघमारे यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या ट्रक मध्ये माल भरून तो झारखंड ला नेत असतांना त्या ट्रक वर असलेल्या चालक व क्लिनर यांनी संगनमत करून तब्बल 89 हजार रुपयांची अफरातफर करून गाडीतील माल चोरून नेल्याची तक्रार वाघमारे यांनी तळेगांव पोलिसांना दिली होती. पण सतत सात दिवस पोलिसांनी तक्रारच दाखल करून न घेतल्याने शेवटी वाघमारे यांनी वरिष्ठांच्या दरबारी विषय लावून धरल्याने वरिष्ठांच्या आदेशावरून तळेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपीना अटक केली होती ज्यामध्ये दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. यादरम्यान प्रकाश वाघमारे यांनी पोलिसांना या दोन आरोपींसोबत अजून एक मास्टर माईंड असल्याचे आपल्या बायांनात सांगितले व त्याबाबत आपल्याकडे पुरावा असल्याचे सुद्धा सांगितल्यावरही पोलिसांनी त्या तिसऱ्या आरोपी बाबत साधी चौकशी सुद्धा केली नसल्याने तळेगांव पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत हे समजत नसल्याने आपल्यावर अन्याय होत आसल्याचे प्रकाश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

याऊलट वाघमारे यांच्यावरच राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यात आला

ज्या तक्रारीत मेडिकल रिपोर्ट नाही किंवा कोणी साक्षीदार ही नाही त्या प्रकरणात डॉक्टरांच्या मेडिकल रिपोर्ट ला बाजूला सारत प्रकाश वाघमारे यांच्यावरच 324 चा गुन्हा दाखल करण्यात आला याउलट यातील मास्टर माईंड च्या विरोधात साक्षीदार पुरावे असतांना सुद्धा सलग सात दिवस ठाणेदार रवी राठोड यांनी दखल न घेतल्याने फिर्यादी वाघमारे यांना वरिष्ठांकडे जाऊन सदरची तक्रार दाखल करून घ्यावी लागली.यामुळे तळेगांव चे ठाणेदार व यातील मास्टर माईंड यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच यातील मास्टर माईंड वर सुद्धा चोरीचा माल विकत घेऊन अफरातफर करण्याबाबत चे गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा येत्या आठ दिवसानंतर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या दालनात न्याय भेटेपर्यंत ठिया करण्यात येईल असा निर्वा नीचा इशारा प्रकाश वाघमारे यांनी दिला आहे.त्यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना ठाणेदार रवी राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले.
माझ्या ट्रक मधील मालाची अफरातफर केल्याची तक्रार करायला गेलो असता पोलिसांनी मला तब्बल सात दिवस ठाण्याच्या फेऱ्या मारायला लावल्या माझी साधी तक्रारही पोलिसांनी दाखल करून घेतली नाही त्यावेळी मी 31 जुलै ला सर्वप्रथम तक्रार देण्यासाठी गेलो तर घेतली नाही तब्बल सात दिवस चकरा मारल्यानंतर जेव्हा पुन्हा 7 ऑगस्ट ला ठाण्यात गेलो असता मला मुंगले हे कर्मचारी ठणेदार राठोड यांच्या बंगल्यावर रेस्ट हाऊस मध्ये घेऊन गेल्यावर ठाणेदारांनी मला माझ्या बँकेचे स्टेटमेंट काढून आणण्यासाठी सांगितले तर मी आर्वीला गेलो असता मला दोन अडीच तास तिथं लागले ते स्टेटमेंट घेऊन येइपर्यंत इकडे ठाणेदार रवी राठोड यांनी माझ्या फिर्याद मधील आरोपीशी संगनमत करून त्यांना बोलावून माझ्यावरच गुन्हा दाखल करून घेतला. व मी सात दिवस ठाण्याच्या चकरा मारूनही माझी साधी तक्रारही घेतली नव्हती किंवा मला तक्रारीची सत्यप्रत सुद्धा दिली नव्हती. आणी उलट ज्या दवाखान्याच्या MLC च्या आधाराने माझ्यावर गुन्हा दाखल झाला मुळात त्या वैद्यकीय अहवालात असे नमूद होते की हाताला प्लास्टर असल्याने जखमी बाबत नक्की सांगता येत नाही तुम्ही जिथून प्लास्टर करून आणले आहे तिथून रिपोर्ट आणावा मग असे असताना 324 दाखल झाला कसा.मी याबाबत ठाणेदारांना विचारले असता त्यांनी सांगितले मी याबाबत वरीष्ठ अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना विचारले असता त्यांनीच मला 324 दाखल करण्यास सांगितले व ते माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे.सोबतच दारू विक्रेत्याबाबत सुद्धा वाघमारे यांनी ठाणेदारांवर गंभीर आरोप करत गावातील दारूचे व्यावसायिक व ठाणेदारांमध्ये सलोख्याचे संबंध असुन ठाणेदारच्या कॅबिन मध्ये नेहमी दारू विक्रेते बसून असतात. ठाणेदारांचे कॅबिन हे अवैध व्यावसायिकांचा अड्डा बनला असल्याचा घनागती आरोप प्रकाश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

प्रतिक्रिया

तपास योग्य दिशेने चालू आहे,संपलेला नाही. अधिक पुरावे गोळा करून कोणीही आरोपी असल्यास त्याची किंवा अन्य संबंधित कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. येत्या काही दिवसात आमची टीम झारखंड ला जाणार आहे,
रवी राठोड, पोलीस निरीक्षक
तळेगाव पो स्टे तळेगांव