Home जळगाव पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील यांच्या निधीतून शवपेट्या वाटप… तीन गावांना आमदार...

पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील यांच्या निधीतून शवपेट्या वाटप… तीन गावांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शवपेट्याचे वितरण…

42
0

रजनीकांत पाटिल

अमळनेर :- जळोद गणाचे पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील यांच्या पंचायत स्थर वाढीव उपकर योजनेअंतर्गत जळोद गणातील तीन गावांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शनिवारी शवपेट्या वितरण करण्यात आल्या.

ग्रामीण भागात मयत झाल्यावर मृत इसमाचे प्रेत बॅक्टेरियांमुळे खराब होऊ नये व संसर्गापासून सुरक्षित राहावे यासाठी ग्रामीण भागात शवपेट्या उपलब्ध नसतात त्यावेळी ग्रामीण भागातील नागरिक शवपेट्या शहरातून नेतात त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व जनतेला स्थानिक पातळीवर सोय व्हावी या उदात्त हेतूने आपल्या मतदारसंघात तीन स्थानिक गावांना शवपेट्या उपलब्ध व्हावी म्हणून तालुक्यातील पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील यांच्या निधीतून आमोदे, तासखेडा, मुडी दरेगाव या गावासाठी शवपेटी वाटप करताना आमदार अनिल भाईदास पाटील, जळोद गणाचे पं स सदस्य प्रविण पाटील, पं स सदस्य निवृत्ती बागुल, माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील , राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, आमोदे सरपंच राजेंद्र पारधी, उपसरपंच जितेंद्र पाटील, संजय पाटील देविदास पाटील, अमृत पाटील, बन्सीलाल पाटील, छोटू पाटील, तासखेडा सरपंच मंगल भिल, माजी सरपंच तापीराम पाटील, उपसरपंच संतोष नाना, देविदास पाटील, नारायण पाटील, अशोक पाटील,बहिरम सर, निंबा पाटील, नंदलाल पाटील ग्रामसेवक आधार धनगर, मुडीदरेगाव सरपंच राजाराम पाटील, उपसरपंच राजू पाटील, विलास पाटील आदी सरपंच व गावकरी यावेळी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting