Home विदर्भ साडी चोळी देत ५१ निराधार मातांचा सत्कार

साडी चोळी देत ५१ निराधार मातांचा सत्कार

137

आगळी वेगळी गौरी पूजन

 

जिव्हाळ्याची भिंत चॅरिटेबल चा अनोखा उपक्रम

यवतमाळ‌ / घाटंजी – ( तालुका प्रतिनिधी) हिन्दू संस्कृतीत गौरी पूजन या सणाला माता लक्ष्मी चे अतिशय मनोभावे पूजन केल्या जाते. घरोघरी नानाविध प्रकारचे नवैद्य गौरी गणपतीला चढविल्या जाते. या सणाचे औचित्य साधून घाटंजी शहरात अविरत अन्नदानाचा वसा उचलून असलेल्या सूरज हमके व सोबतीला असलेल्या युवकाच्या मनात एक वेगळीच संकल्पना निर्माण झाल्याने त्यांनी जे निराधार, गरीब, अपंग, वयोवृद्ध महिला अश्या घटकातील गरजवंताना गौरी पूजन दिनी खरी महालक्ष्मी खरी गौरी समजून त्यांचे पूजन करून साडी चोळी भेट देत हा सन साजरा केला.
सतत २ वर्षा पासून सूरज हेमक हा युवक आपल्या साथीदाराला सोबत घेवून अन्नदाना सोबत कोणते ना कोणते उपक्रम गरजवंत असलेल्या साठी घेत आहे. मात्र या वेळेला त्यांनी जिवंत माणसात देव पहावा ही युक्ती अंगिकारत निराधार, अपंग, वयोवृद्ध महिला यांच्यातच देव आहे हे समजत त्यांना भोजनसह साडीचोळी भेट दिली. प्रत्येक सणाला सूरज काही वेगळे पणा करून दाखवतो त्यानुसार गरजवंत निराधार त्याची प्रत्येक सणाला वाट बघत असतात हे विशेष आणि तो आला की प्रत्येक महिला भारावून जातात. अश्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने सूरजची घाटंजी शहरात चांगलीच वाहवाह होताना दिसत आहे. ऊन, वारा, पाऊस असो याची तमा सूरज न बाळगता त्याचे जे ध्येय समोर आहे ते तो पूर्ण करतो. अश्या गरजवंता ची सेवाच तो ईश्वर सेवा मानून सेवा देतो आहे. गौरी पूजन दिनी राबविलेल्या उपक्रमात सूरज ला सुनिल हुड, रोहीत भोयर, निखिल मस्के, दत्ता अादे, करण पंधरे, अब्बु बिजेवार, अवि भोयर, बबलू परचाके यांनी मोलाचे सहकार्य करीत हा आगळा वेगळा उपक्रम यशस्वी केला. यामुळे घाटंजी कराकडून त्यांचे कौतुक होत आहे.