Home जळगाव भक्तांना दर्शनासाठी तत्काळ मंदिरे उघडण्याची परवानगी द्यावी…. विश्व हिंदू परिषद व बजरंग...

भक्तांना दर्शनासाठी तत्काळ मंदिरे उघडण्याची परवानगी द्यावी…. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे तहसीलदारांना निवेदन.

42
0

रजनीकांत पाटिल

अमळनेर :- भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिरे उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दि. २९ रोजी तहसीलदार मिलिंद वाघ यांना हे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात महाराष्ट्र राज्य ही संताची भूमी असून इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मंदिरे उघडण्याची परवानगी द्यावी. व भाविक भक्तांना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. सदर निवेदनावर संजय विसपुते, सुरेखा पवार, लक्ष्मण कासार, पवन बारी, हितेश नारखेडे, गणेश सोलांखे, मनोज मराठे, किरण बोरसे आदींच्या सह्या आहेत.

Unlimited Reseller Hosting