Home जळगाव पीक विम्याच्या बनावट पावत्या फाडून शेतकऱ्यांची फसवणूक आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द

पीक विम्याच्या बनावट पावत्या फाडून शेतकऱ्यांची फसवणूक आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द

349

रजनीकांत पाटिल

अमळनेर – शहरात बनावट सीएससी सेंटर उघडून पीक विम्याच्या बनावट पावत्या फाडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी गिरीश बिरारी याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र व अति.न्यायालयाने रद्द केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,आरोपी गिरीश बिरारी यांनी २०१७ पासून हेडावे , गडखांब , हिंगोणें , दहिवद,तासखेडा,खोकरपाट,सडावन, वंजारी , नगाव,बिलखेडा,वावडे, मांडळ,मंगरूळ,धानोरा, एकलहरे या गावातील सुमारे ६१ शेतक-यां कडून पीक विम्याच्या हप्त्यापोटी १ लाख ५८ हजार ४६५ रुपयांचे हप्ते वसूल करून त्यांच्या ४६ लाख १०हजार ५३३ रुपयांचे पीक विम्याचे नुकसान झाले आहे. रवींद्र भाऊराव पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिसात वेदांतचे मालक गिरीश विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा कॉम्प्युटर मधील डाटा व त्यात तयार बनावट लिंक याबाबत शोध व जप्त करण्यासाठी आरोपीचा जामीन नाकारावा असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. किशोर बागुल मंगरुळकर यांनी केला सदर आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा सत्र व अति. न्यायाधीश व्ही.आर.जोशी यांनी रद्द केला आहे. सरकार पक्षातर्फे अॅड किशोर बागुल मंगरुळकर तर फिर्यादीतर्फे अॅड सलीम खान यांनी काम पाहिले.