
परिसरात उडाली खळबळ ,
अमीन शाह ,
अंबाजोगाई ,
बापाच्या इच्छे विरुद्ध जाऊन मुलाने प्रेम विवाह केला होता त्या मुळे चीडून बापाने मुलास घरा बाहेर काढले होते मात्र आई ची माया आईने त्या मुलास पुन्हा घरात घेतले त्यामुळे या माथेफिरुणे आपली पत्नी व सून यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढविला या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली तर सुने चा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे , या संदर्भात पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील बाळासाहेब लव्हरे हे आपल्या परिवार सह राहत होते मात्र गेल्या काही वर्ष पूर्वी त्यांचा मुलगा अजय लव्हरे याने गावातीलच शीतल नावाच्या मुली सोबत प्रेम विवाह केला होता त्या मुळे बापाने मुलाला घरातून काढून टाकले होते परंतु काही वर्षां नंतर सून व मुलाला आई सुवर्णा याने घरात घेतले याचा राग बाळासाहेब याला आला व त्याने रागाच्या भरात आपली पत्नी सुवर्णा सून शीतल यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला या हल्ल्यात सून ठार झाली तर पत्नी गंभीर जखमी आहे धर्मीयां घडलेल्या घटने मूळे परिसरात हळहळ वयकत केली जात आहे , मृतक ला एक चार वर्षां ची मुलगी असून ती मुलगी आई गेल्याने पोरकी झाली आहे , या घटनेचा तपास पोलीस अधिकारी राहुल धस करित आहे ,











































