Home महत्वाची बातमी विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

306

 

बुलडाणा ,

चांडोळ,येथील राजू रामधन खैरे या ३८ वर्षीय युवकाचा गट क्रमांक ६४४ मधील शेतातील विहिरीत मृतदेह तरंगताना आढळले.
धाड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू खैरे या युवकाचा मृतदेह गट क्र.६४४ मधील विहिरीत तरंगताना आढल्याची फिर्याद निलेश रामधान खैरे याने धाड पोलीस ठाण्यात दिली.
मृतक राजू खैरे याचे शरीर पाण्यात पूर्णतः फुग्ल्याने शवविच्छेदन विहिरीच्या जवळच करावे लागले तसेच अंतिम संस्कार सुद्धा त्याच ठिकाणी करावे लागले.पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने,पो.कॉ.प्रविण इंगळे,ऋषिकेश पालवे करीत आहे.