Home विदर्भ अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केलेला प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा केला...

अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केलेला प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा केला नष्ट

241

रवि माळवी

यवतमाळ , दि. ०९ :- मागील वर्षात विविध ठिकाणी धाडी टाकून जप्त केलेला प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा लोहारा एम आय डीसी येथील बजरंग क्रापन्ट बोर्ड यांच्या बॉयलर भट्टीमध्ये जाळून नष्ट केला. ही कारवाई दिनांक ७ जानेवारी रोजी यवतमाळ येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने केली.
अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) कृष्णा जयपुरकर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ७ जानेवारी २०२० रोजी यवतमाळ कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल मोहोरे व संदीप सुर्यवंशी यांनी अन्न व औषध प्रशासनातर्फे मागील वर्षात विविध ठिकाणी धाडी टाकुन जप्त केलेला प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा पंचासाक्षीदार व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासमक्ष लोहारा एम आय डी सी येथील बजरंग क्राप:ट बोर्ड यांच्या बॉयलर भट्टीमध्ये जाळुन नष्ट केला.
अन्न व औषध प्रशासनाकडुन वेळोवेळी जप्त केलेला प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा तातडीने नष्ट करण्यात येते व संबंधितांविरुध्द न्यायालयात खटले दाखल करण्यात येतात. सदरच्या जप्त केलेल्या साठ्याची एकुण किंमत रुपये २६ लाख १५ हजार २८९ इतकी होती. सदर साठ्यामध्ये प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखू, पानमसाला तसेच विविध प्रकारचा गुटखा या अन्न पदार्थाचा समावेश होता.
जनआरोग्याचा विचार करता प्रतिबंधित अन्न पदार्थाविरुध्द धडक मोहिम यापुढेही सतत सुरु राहील. गुटखा, पानमसाला, सुगंधित, स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित स्वादिष्ट सुपारी ईत्यादी प्रतिबंधित पदार्थाची उत्पादन, वितरण, साठवण व विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत प्रशासनास माहिती देऊन गुटखाबंदी प्रभावीपणे अमलात आणणेकामी सहकार्य करावे व जनतेने, विशेषत: युवा वर्गाने अशा पदार्थाचे सेवन करु नये असे आवाहन कृष्णा जयपुरकर, हाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व प्रशासन (म.राज्य) यवतमाळ यांनी केले आहे.