Home मराठवाडा बंजारा लाईव्हचे रिपोर्टर आनंद आढे यांचे दुःखद निधन

बंजारा लाईव्हचे रिपोर्टर आनंद आढे यांचे दुःखद निधन

278

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

परतूर तालुक्यातील हस्तुर तांडा येथील रहिवाशी व बंजारा लाईव्ह चॅनलचे जालना जिल्हा प्रतिनिधी आनंद आढे यांचे आज गुरुवारी दिनांक २७ रोजी दुपारी दुःखद निधन झाले.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी कि,आनंद आढे यांचा जवळपास एक महिन्यापूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते. मागील वीस-पंचवीस दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान आनंद आढे हे मृत्यूशी झुंज देत होते. परंतु आज गुरुवारी दुर्दैवाने त्यांचे दुःखद निधन झाले. जालना जिल्ह्यातील युवा पत्रकाराने वयाच्या २२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी त्यांनी आपल्या जीवनातील शेवटचा श्वास घेतला.घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगाव संस्थानचे मठाधिपती महंत श्रीकृष्ण पुरी महाराज यांची त्यांनी भेट घेऊन सत्कार केला होता .पत्रकार आनंद आढे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. आनंद आढे यांचा अंत्यविधी गुरुवारी सायंकाळी करण्यात येणार आहे.