Home नांदेड माहुरात गोरसेनेची बैठक संपन्न

माहुरात गोरसेनेची बैठक संपन्न

145

मजहर शेख

नांदेड/माहूर,दि: २९:- माहूर शहरातील टी पाइंट येथे माहूर तालुका गोर सेना पदाधिकारी यांची बैठक दि.27 रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी संघटनेची ध्येय धोरणे, विविध उपक्रम, आंदोलने,संघटनात्मक बांधणी याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोरसिखवाडी चे प्रमुख काशीनाथ नायक यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी मार्गदर्शक म्हणून जिल्हा संयोजक प्रकाश पवार, जिल्हा अध्यक्ष अँड.प्रदिप राठोड, उपस्थित होते. या बैठकीत वरिष्टाच्या उपस्थितीत माहूर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.तसेच वाई बा. व वानोळा जि.प.गटातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी प्रास्ताविक गोर सेनेचे माहूर तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांनी मांडले.यावेळी गोर सेनेचे किनवट तालुकाध्यक्ष अतुल राठोड, माहूर तालुका उपाध्यक्ष उकंडराव पवार,सचिव अर्जुन पवार,कुणाल राठोड, यादव आडे,प्रदीप पवार,प्रल्हाद राठोड,किशोर राठोड यांच्यासह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन उकंडराव पवार यांनी तर आभार कुणाल राठोड यांनी मानले.