Home महाराष्ट्र राबणाऱ्या पत्रकारांची कदर कोन्हाला???

राबणाऱ्या पत्रकारांची कदर कोन्हाला???

876

कधी बघितलं का?

एखादा संपादक , जिल्हा प्रतिनिधि , एखादा नेता एखादा , अधिकारी एखदा तरी ग्रामीण शहरी पत्रकारांच्या घरी गेलात सांगा की गप्प का? अरे बाबांनो बोला तरी…
आयुष्यभर गावाची , शिवाची , अडचण लिहिली नेत्या अधिकाऱ्यांच्या बाईट , मुलाखती , कोट घेतल्या जे – जे लिहिलं दाखवलं त्याला जबाबदार त्यांच्या पेक्षा तुम्हीच की , वेळ आली की त्याबदल्यात येणारे हल्ले , दमदाटया अडवणुकी वैर
तुम्हीच भोगायच बरका..
बिनपगारी घरची अर्धी भाकर सोडून जगाची अडचण मांडायला तिला वाचवायला निघालेला बिन पगारी व बिगर मानधन असलेले कित्येक वार्ताहर केवळ वेडेपणा व्यासंग व्रत म्हणून ह्या पत्रकारितेत आयुष्यभर राबत आहे . बोटावर मोजता येतील तितकेच या लोकांत नोकरीवाले , धंद्यावले , असतील बाकी सगळे घरादाराची कमाई बातमीसाठी उडवणारे दैनिक व वृत्त वाहिन्यांचे पोट भरणारी मंडळी त्यात मी ही तेच करत आहेच आणी हाती असुरक्षितता अडचण , आजार अपघात , मारहाण , दमदाटी झाली की पूर्ण निराधार अशी गत फिल्डवर काम करणाऱ्या ग्रामीण/शहरी पत्रकारांची वृत्त छायाचित्रकारांची आहे.
राज्यातील व गावातील लोकांना कदर नाही , नेत्यांना कदर नाही , सरकारला कदर नाही तर कदर फक्त निष्ठ पत्रकारांना सामाजिक मुद्द्यांची असते कारण बिटवर कार्यरत पत्रकार एकदा जेवणार नाही पण त्याचे बातमीसाठी राब राब राबने
हा त्याचा रोजचा भाग
घरातील अडचणींशी घरातील खर्चाशी त्याचा ताळमेळ नसतो नेहमी अडचणीत जगणारा लोकांच्या जगण्यासाठी बातमीद्वारे वाचा फोडणारा सामान्य पत्रकारांच्या घरच्या अडचणींशी कोन्हाला घेणं देणं नाही व केवळ जगाचे मुद्दे मांडणारा वार्ताहर मर – मर मरतोय आणी अडचणीत जगतोय त्याच्या घरच्या अडचणी कोणत्या?
यावर स्वातंत्र्यानंतर अजूनही एक योजना आली नाही की संकटात पत्रकारांना हातभार लावण्यासाठी कोण्ही नेता अधिकारी भांडवलदार पुढं आला नाही व येणार ही नाही….
शेवटी आपण फक्त गुरा ढोरांप्रमाणे राबायचे फक्त….

आपला –
राम खुर्दळ ( पत्रकार )
राज्य उपाध्यक्ष – पत्रकार संरक्षण समिती , महाराष्ट्र राज्य…