मराठवाडा

भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी राहुल लोणीकर यांची नियुक्ती

Advertisements
Advertisements

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

भाजपा युवा मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी ही कार्यकारिणी घोषित केली. जालना जिल्ह्यातील भाजपाचे तरुण नेतृत्व, जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य राहुल बबनराव लोणीकर यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस पदी तीन जणांची निवड करण्यात आली असून मराठवाड्यातून एकमेव राहुल लोणीकरांना संधी देण्यात आली आहे. विदर्भातून नागपूरच्या शिवानी दानी वखरे यांना तर पश्चिम महाराष्ट्रातून पुण्याच्या सुशील मेंगडे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्ष संघटनेत अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सरचिटणीस पदावर राहुल लोणीकरांची वर्णी लागल्याने मराठवाड्यातील पक्ष संघटनावर लोणीकरांची पकड अधिक घट्ट होण्यास मदत होईल असे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे. मुख्यमंत्री चषक स्पर्धेत खेळाडूंची सर्वाधिक नोंदणी, सर्वाधिक सामन्याचे आयोजन, मराठवाडा स्तरावर रक्तदान शिबिरांचे आयोजन आदी पक्षाचे ठरवून दिलेल्या उपक्रमांमध्ये राहुल लोणीकरांनी सहभाग नोंदवून ते यशस्वी करून दाखविल्याचे बक्षिस म्हणून हे महत्वाचे पद त्यांना देण्याचे आल्याचे बोलले जाते.

राहुल लोणीकर यांच्या निवडी बद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार, भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनमताई महाजन, माजी मंत्री बबनराव लोणीकर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील महाराष्ट्र प्रभारी संजय कोंडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

राहुल लोणीकरांच्या नियुक्तीबद्दल संपूर्ण जालना जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात ठिकठिकाणी फटाके फोडून भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी, कुंभार पिंपळगावात येथेही रोहयो तालुकाध्यक्ष अंकुश बोबडे, दत्ता चिमणे, विठ्ठल बोबडे, भाऊसाहेब देवडे, रामेश्वर गरड, सिद्धेश्वर भानुसे, नितीन भुतेकर, राहूल काळे, किशोर गिराम, विकास मुकणे, नितीन शिंदे, योगेश ढोणे, लहू मुळक, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...