Home महत्वाची बातमी अशी नको ग सून बाई ????

अशी नको ग सून बाई ????

706

 

तिने भीक मागून करोडो ची संपत्ती जमवली होती ,

पण ? लालची सुनेने केला घात ,

 

अमीन शाह

 

नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर सासूवर भीक मागायची पाळी आली, नवरा गेल्याने कोणाचाच आधार नसल्याने तसेच पोटी अपत्य देखील नसल्याने त्यांनी दिराच्या मुलाला दत्तक घेतले आणि त्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली. भीक मागून ती महिला आपला उदरनिर्वाह करत होती. कित्येक वर्षे भीक मागून मागून त्यांनी मुंबईत स्वतःच्या मालकीचे चार फ्लॅट घेतले.
कालांतराने मुलाचे लग्न झाले आणि सुनबाई घरात आली. सून घरात आल्याने सुखाचे दिवस येतील अशा तिची धारणा होती मात्र चार फ्लॅट सासूच्या मालकीचे आहेत हे समजल्यावर सुनेच्या तोंडाला पाणी सुटले आणि वैयक्तिक वाद तसेच संपत्तीच्या लालसेने तिने सासूचा खून केला. विशेष म्हणजे खून केल्यानंतर त्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा देखील सुनेचा प्रयत्न होता मात्र तिचा प्लॅन फसला आणि तिला अटक करण्यात आली. मुंबईत घडलेल्या या धक्कादायक घटनेने पैशासाठी लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात हे देखील उघड झाले आहे
चेंबूरमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय संजनाबाई पाटील या वृद्धेची ही कथा असून त्याची सून असलेली अंजना हिने आपल्या सासूचा खून केल्याचे उघड झाले आहे .संजनाबाई पाटील यांचे मुंबईत स्वतःच्या मालकीचे चार फ्लॅट आहेत. त्यातील दोन चेंबूर आणि दोन वरळीमध्ये आहेत. एका फ्लॅटमध्ये त्या स्वतः मुलगा दिनेश आणि त्याची पत्नी अंजनासोबत राहत होत्या तर तीन फ्लॅट इतर जणांना भाड्याने दिले होते. त्याचे भाडे देखील त्यांना मिळत होते मात्र तरीदेखील घाटकोपर येथील मंदिराबाहेर त्या भीक मागत असत.
अशातच संजनाबाई यांना जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यांचा बाथरुममध्ये पाय घसरला आणि त्या पडून जखमी झाल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे होते मात्र डॉक्टरांना त्यांच्या बोलण्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना खबर दिली. पोलीस हॉस्पिटलला पोहचल्यावर त्यांना संजनाबाईंच्या शरीरावर १४ जखमा आढळून आल्या तसेच गळ्याभोवती काही व्रण दिसून आले. त्याप्रमाणे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.

पोलिसांनी चौकशीला सुरुवात करताच , सूनेकडून सुरुवातीला उत्तरं देण्यास टाळाटाळ करण्यात आली त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. घटनेच्या दिवशी आई आणि आजी यांच्यात जोरदार भांडण झालं होतं, अशी माहिती मयत वृद्धेच्या नातीनं पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सुनेला ताब्यात घेतले आणि घडलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याचदरम्यान सुनेने मृत वृद्धेचे सोन्याचे दागिने सूनेनं लपवून ठेवल्याची माहितीही उघड झाली.

उपलब्ध माहितीनुसार, सून अंजना आणि सासू संजनाबाई यांच्यात वाद झाला. कडाक्याच्या भांडणानंतर अंजनाला राग अनावर झाला आणि तिनं कोपऱ्यातील बॅट उचलली आणि संजनाबाई यांच्यावर प्रहार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या.

मात्र इतके करूनही सुनेचे समाधान झाले नाही तिने मोबाईल चार्जरच्या वायरने गळा दाबला. सासूचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तिने सासू बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याचा बनाव रचला. चौकशीदरम्यान, मात्र, त्यांची हत्या केल्याची कबुली तिनं दिली. चेंबूर आणि वरळीत असलेले फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी त्यांचं भांडण होत असे. यातूनच संजनाबाईंची हत्या केल्याची तिने कबुली दिली आहे .