Home नांदेड गणेशोत्सव घरीच साजरा करून कोरोनापासून कुटूंबाला वाचवावे – जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार...

गणेशोत्सव घरीच साजरा करून कोरोनापासून कुटूंबाला वाचवावे – जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर

161

मजहर शेख

नांदेड / किनवट, दि. २१ :-  आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो लोकं एकत्र जमण्याची परंपरा वारकरी बांधवांनी खंडीत करून कोरोनाच्या संभाव्य प्रसाराला थोपविले, मग आपणही सार्वजनिक उत्सवाचा आग्रह न धरता घरच्या घरीच गणेशोत्सव साजरा करून आपल्या कुटूंबाला व गावाला कोरोनापासून वाचवावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी केले.


नांदेड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने येथील साईबाबा कल्याण मंडपम् येथे गुरुवारी ( दि. 20 ) दुपारी 5 वाजता आयोजित किनवट व माहूर तालुका ” गणेशोत्सव व मोहरम् सणानिमित्त शांतता समितीच्या बैठकीत ” प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तहसिलदार उत्तम कागणे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक ( किनवट ) व विलास जाधव ( माहूर ) उपस्थित होते.
पुढे बोलतांना पोलिस अधिक्षक मगर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर दि .22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला होता. त्यानंतर गुडीपाडवा, रामनवमी व खूप मोठ्या प्रमाणात साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुध्द जयंती, रमजान, ईद, पोळा आदी उत्सव सणं आपण घरूनच ऑनलाईन साजरी केलेत. मग अशाच प्रकारे गणेशोत्सव, मोहरम आगामी सर्व सण आपण घरीच साजरे करून कोरोनाची वाढती साखळी थोपवूया.
अध्यक्षीय समारोप करतांना आमदार भीमराव केराम म्हणाले की, शांततेत सण, उत्सव साजरा करण्याची किनवट – माहूर विधानसभा मतदारसंघातील जनतेंची ऐतिहासिक परंपरा आहे. परंतु यावर्षाची कोरोनाची स्थिती पाहता आपण घरीच गणेशोत्सव साजरा करावा.
किनवटचे पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मांडवीचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी आभार मानले. याप्रसंगी राकाँपचे विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील, रिपाईंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, भाजपा प्रदेश सदस्य शिवराज राघू मामा, जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्माणीवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, जयश्री भरणे, पवार स्वामी, शेतकरी संघटनेचे त्रिभूवनसिंह ठाकूर, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान, साजीद खान आदींनी मनोगत व्यक्त केले.
साईबाबा संस्थानच्या वतीने माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार, के. मूर्ती, प्रा. किशनराव किनवटकर, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमसिंग जाधव, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अजय कदम, कैलास सिलमवार, पोलिस पाटील पांडूरंग कवडे, सरपंच बाळू पवार, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गुट्टे आदिंनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, राकाँपचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड, सेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील मुरकुटे, ज्येष्ठ सेना नेते मारोती सुंकलवाड, विजय वाघमारे, रिपाईं तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार आदी मान्यवरांसह किनवट माहूर तालुक्यातील सर्व पोलिस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, विविध पक्ष, संघटना, गणेश मंडळ, पत्रकार संघ पदाधिकारी शारीरिक अंतर ठेऊन, मास्क वापरुन उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहूरचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख, सिंदखेडचे सहायक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर, इस्लापूरचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार कांबळे, पोलिस उप निरीक्षक गणेश पवार, प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, जमादार पांडुरंग बोंडलेवाड, अप्पाराव राठोड, पोलीस कर्मचारी गजानन चौधरी, लखुळे, परमेश्वर गाडेकर, बोधमवाड, सुनील कोलबुधे, राजू पाटोदे, ज्ञानबा लोकरे, महिला पोलीस कर्मचारी रायलवड, शिंदे, गजलवार, कुऱ्हे, संदीप वानखेडे, सुरेश माने, नागनाथ जेठे, लक्ष्मण भालेराव, गंगाराम कनकावार, ज्योती पिलवार, संजीवनी मुनेश्वर आदींनी पुढाकार घेतला.