Home महत्वाची बातमी डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांच्या प्रयत्नांना यश….!!

डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांच्या प्रयत्नांना यश….!!

83
0

ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेचा ठराव विधानसभेत मंजूर…!!!

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नागपुर , दि. 08 :- जनगणना 2021 मध्ये ओबीसींची स्वतंत्र जातिनिहाय स्वतंत्र जनगणना करण्यासाठी विधीमंडळात ठराव मंजूर करून हा विषय केंद्र शासनाकडे रेटून धरण्याच्या विनंतीचे निवेदन “पाटी लावा” आंदोलनाच्या संयोजक डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ना. एकनाथ शिंदे, ना. छगन भुजबळ, ना. बाळासाहेब थोरात, ना. विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रणिती शिंदे, बच्चु कडू, रोहीत पवार, किशोर जोरगेवार तसेच अनेक विधिमंडळ सदस्यांना दिले होते व याचा सातत्त्याने पाठपुरावाही केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे. देशाच्या जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी शिफ़ारस केंद्र सरकारला करणारा ठराव विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला आणि तो एकमताने मंजूरही करुन घेतला आहे.

2021 मध्ये होणा-या जनग़ननेच्या नमुना अर्जात ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम नसणे हा ओबीसींच्या संविधानिक अधिकाराची गळचेपी असून याविरोधात डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांनी पुढाकार घेत उच्च न्यायालयात (नागपूर खंडपीठ) मध्यस्थी अर्ज दाखल करून जनगणना 2021 ला आव्हान दिले आहे. याशिवाय ‘जनगणना 2021 मध्ये ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही, अशी “पाटी लावा” मोहीम डॉ ऍड साळवे यांनी सुरू केली आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ गोंदीया, वर्धा या जिल्ह्यात ‘पाटी लावा’ मोहीमेने लोकचळवळीचे रुप धारण केले आहे. राज्य शासनानेही हा विषय केंद्राकडॅ रेटून लावण्याची मागणी डॉ ऍड अंजली साळवे यांनी राज्यातील सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींना केली होती.

आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनीही लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मांडून संपुर्ण देशाचे लक्ष या ज्वलंत विषयाकडे वळविल्याची माहिती डॉ साळवे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, नामदार एकनाथ शिंदे, नामदार छगन भुजबळ, नामदार बाळासाहेब थोरात यांचेसह आमदार विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, बच्चु कडू, रोहीत पवार, किशोर जोरगेवार यांचेशी झालेल्या चर्चेदरम्यान दिली होती.

विधानसभा ओबीसीची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी करणारा ठराव एकमताने मंजूर करून सर्वसामान्य ओबीसींची मागणी उचलून धरल्याने डॉ ऍड साळवे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमत्री अजीत पवार , ना. विजय वडेट्टीवार यांचेसह सर्व लोकप्रतिनिधींचे सोबतच या लढ्यात सहभागी असलेल्या सर्व ओवीसी संघटना , ओबीसी बांधव यांनी वेळोवेळी घेतलेल्या भुमिका यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळात ओबीसींच्या लढ्याला यश मिळाल्याने या सर्वांचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले आहे.